मुंबई 23 फेब्रुवारी : ‘मधुबाला’ (Madhubala) या भारतीय सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. 50-60च्या दशकात आपल्या अफाट सौंदर्यानं घायाळ करणाऱ्या मधुबाला यांचे प्रेमसंबध अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्याशी होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता. परंतु काळाची चक्र फिरली अन् दोघं एकमेकांविरोधात चक्क कोर्टात उभे राहिले. दिलीप कुमार यांनी मधुबाला यांच्याविरोधात साक्ष दिली होती. (Madhubala’s 52nd Death Anniversary) प्रकरण काय होत? 1957 साली नया दौर नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत अभिनेत्री वैजंतीमाला झळकल्या होत्या. परंतु यापुर्वी मधुबाला यांना या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आलं होतं. जवळपास 40 दिवस या चित्रपटासाठी आऊट डोर शुटिंग करावं लागणार होतं. परंतु मधुबाला यांचे वडिल त्यासाठी तयार नव्हते. अखेर त्यांच्याजागी वैजंतीमाला यांना कास्ट करण्यात आलं. अर्थात निर्मात्यांचा हा निर्णय मधुबाला यांच्या वडिलांना आवडला नाही. अन् त्यांनी निर्मात्यांना थेट कोर्टात खेचलं. B’day Special: भाग्यश्रीमुळं चित्रपट मिळणं झालं होतं बंद, सलमान खाननं स्वतः सांगितला किस्सा निर्मात्यांनी देखील मधुबाला यांच्या व्यावसायिक वर्तणूकीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी शेवटच्या क्षणी काम करण्यास नकार दिल्यामुळे आम्ही दुसऱ्या अभिनेत्रची निवड केली. अन्यथा आम्हाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला असता. असं वक्तव्य निर्मात्यांनी कोर्टात दिलं. त्यानंतर दिलीप कुमार यांनी देखील मधुबाला यांच्याविरोधात कोर्टात साक्ष दिली. परिणामी दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. दरम्यान दिलीप कुमार यांनी मधुबालांना लग्नासाठी विचारलं होतं परंतु त्यांच्या वडिलांनी लग्नास नकार दिल्यामुळं अखेर दोघांच ब्रेकअप झालं.