Home /News /entertainment /

B'day Special: भाग्यश्रीमुळं चित्रपट मिळणं झालं होतं बंद, सलमान खाननं स्वतः सांगितला किस्सा

B'day Special: भाग्यश्रीमुळं चित्रपट मिळणं झालं होतं बंद, सलमान खाननं स्वतः सांगितला किस्सा

अभिनेत्री भाग्यश्री 52 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

अभिनेत्री भाग्यश्री 52 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

मैंने प्यार किया सिनेमात लोकांच्या सलमान खान (Salman Khan) आणि भाग्यश्रीची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. मात्र, हे कदाचित आपल्याला माहिती नसावं, की या सिनेमात सलमान खानपेक्षा जास्त पसंती भाग्यश्रीला मिळाली होती.

    नवी दिल्ली 23 फेब्रुवारी : 'मैंने प्यार किया' या सिनेमातील सुमन म्हणजेच भाग्यश्री (Bhagyashree Patwardhan) सगळ्यांच्या लक्षात असेल भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969 मध्ये झाला होता. भाग्यश्रीनं 1989 मध्ये आलेल्या सलमान खानच्या मैंने प्यार किया (Maine Pyar Kiya) या  सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी त्यागी आणि राणा या सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी आपल्या पहिल्या सिनेमानंतरच उद्योगपती हिमालय दासानी (Himalaya Dasani) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती आणि याच कारणांमुळे चित्रपटांपासून दूर राहाणंही पसंत केलं होतं. भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला होता. त्यांचे वडील विजयसिंह राव माधवराव पटवर्धन सांगलीचे राजा होते. भाग्यश्रीला दोन बहीण मधुवंती आणि पोर्णिमा होत्या. भाग्यश्रीचं खरं नाव श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राज पटवर्धन असं आहे. भाग्यश्रीनं केवळ हिंदी सिनेमांमध्येच काही तर भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. भाग्यश्री यांना दोन मुलंही आहेत. त्यांच्या मुलाचं नाव अभिमन्यू तर  मुलीचं नाव अवंतिका दासानी आहे. भाग्यश्री सोशल मीडियावर भरपूर सक्रीय असतात. 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यांना भाग्यश्री योजनेच्या ब्रॅण्ड अॅम्बॅसिडरही बनवलं होतं. मैंने प्यार किया सिनेमात लोकांच्या सलमान खान (Salman Khan) आणि भाग्यश्रीची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. मात्र, हे कदाचित आपल्याला माहिती नसावं, की या सिनेमात सलमान खानपेक्षा जास्त पसंती भाग्यश्रीला मिळाली होती. याच कारणामुळे यानंतर बराच काळ सलमान खानला सिनेमांच्या ऑफरही येणं बंद झालं होतं. सलमाननं स्वतः या गोष्टीचा खुलासा आप की अदालतमध्ये केला होती. सलमान म्हणाला होता, मला मैंने प्यार किया या सिनेमानंतर 4 ते 5 महिने काहीच काम मिळालं नव्हतं. मला असं वाटत होतं, की आता मला काम मिळणारही नाही. कारणा त्यावेळी भाग्यश्री मॅडमनं असं ठरवलं होतं, की आता त्या चित्रपटात काम करणार नाहीत आणि लग्न करणार आहेत. यानंतर भाग्यश्रीनं लग्नही केलं आणि सिनेमाचं पूर्ण श्रेयही घेऊन गेली. इंडस्ट्रीतील सगळ्यांना असं वाटलं, की लीड कलाकार तिच होती आणि मी काहीच नाही. सलमान आणि भाग्यश्रीचा आणखी एक किस्स आहे. असं म्हटलं जातं, की एकदा एका फोटोग्राफरनं सलमान खानला फोटोशूटदरम्यान भाग्यश्रीला किस करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यानं तसं करण्यास नकार दिला. जेव्हा ही गोष्ट भाग्यश्रीला माहिती झाली, तेव्हा तिच्या नजरेत सलमान खानसाठी सन्मान आणखीच वाढला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Romantic film, Salman khan

    पुढील बातम्या