JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पाहा आयुष्मानच्या पत्नीचा बाथरुम सेल्फी; सांगितले वजनदार शरीराचे फायदे

पाहा आयुष्मानच्या पत्नीचा बाथरुम सेल्फी; सांगितले वजनदार शरीराचे फायदे

बाथरुम फोटो शेअर करत तिनं स्वत:च्या शरीराची तुलना जगप्रसिद्ध पॉपस्टार केंडल जेनरसोबत (Kendall Jenner) केली आहे. तिचा हा लक्षवेधी फोटो आणि पोस्ट पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 14 फेब्रुवारी : प्रसिद्ध लेखिका आणि चित्रपट निर्माती ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन पोस्ट, फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील ती अशाच एका अनोख्या पोस्टमुळं चर्चेत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिनं बाथरुम फोटो शेअर करत स्वत:च्या शरीराची तुलना जगप्रसिद्ध पॉपस्टार केंडल जेनरसोबत (Kendall Jenner) केली आहे. तिचा हा लक्षवेधी फोटो आणि पोस्ट पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क. अलीकडेच केंडल जेनरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये तिनं अभिनेत्री किम कदार्शियनसोबत एक जाहिरात केली होती. या फोटोवर निशाणा साधत ताहिरानं स्वत:ची तुलना केंडलसोबत केली आहे. माझं शरीर केंडलपेक्षा वजनदार आहे. परंतु या वजनदार शरीराचे देखील अनेक फायदे आहेत. असा टोला तिने लगावला. (Tahira Kashyap bathroom selfie)

संबंधित बातम्या

नेमकं काय म्हणाली ताहिरा? ताहिरा कश्यप ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आहे. “केंडलचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो पाहून इतर महिलांप्रमाणेच मी देखील माझ्या शरीराची तुलना तिच्यासोबत करत होते. माझं शरीर तिच्यासारखं स्लीम ट्रिम होऊ शकतं का? तिचं शरीर नक्कीच आकर्शित करणारं आहे. पण तिनं परिधान केलेल्या त्या कपड्यांमध्ये माझ्या शरीराचा लहानसा भाग देखील झाकला जाणार नाही. मी एका 69 किलो वजनाच्या महिलेला पाहिलं आहे. जिनं एका पर्वतासारखं उभं राहून ताकदीनं एक वजनदार दरवाला उघडला होता. मला देखील या वजनदार शरीरामुळं हिरो असल्याचा भास होतो.” अशा आशयाची एक लांबलचक पोस्ट ताहिराने लिहिली आहे. अवश्य पाहा -  सिद्धार्थ-मितालीचे Unseen PHOTO आले समोर; पुण्याजवळ वाड्यात असं झालं लग्न सोबतच तिनं स्वत:चा एक बाथरुम सेल्फीदेखील शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत तिच्या फोटोचो कौतुक केलं आहे. ताहिरा कश्यप ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आहे. 2008 साली त्यांनी लग्न केलं होतं. लहानपाणापासूनच दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांना विराजवीर आणि वरुष्का नावाची दोन मुलं आहेत. ताहिरानं काही वर्षांपूर्वी कर्करोगाशी देखील झुंज दिली होती. त्यावेळी देखील तिनं उपचार सुरु असताना तिनं एक फोटो शेअर केला होता. तो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या