मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थ-मितालीचे Unseen PHOTO आले समोर; पुण्याजवळ वाड्यात असं झालं लग्न

सिद्धार्थ-मितालीचे Unseen PHOTO आले समोर; पुण्याजवळ वाड्यात असं झालं लग्न

सिद्धार्थ आणि मितालीचं लग्न दृष्ट लागण्यासारखं देखणं झालं. हे सोहळ्यातले न पाहिलेले फोटोज अजूनच खास आहेत.

सिद्धार्थ आणि मितालीचं लग्न दृष्ट लागण्यासारखं देखणं झालं. हे सोहळ्यातले न पाहिलेले फोटोज अजूनच खास आहेत.

सिद्धार्थ आणि मितालीचं लग्न दृष्ट लागण्यासारखं देखणं झालं. हे सोहळ्यातले न पाहिलेले फोटोज अजूनच खास आहेत.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 13 फेब्रुवारी : मराठीतले लोकप्रिय सेलिब्रिटी ((popular celebrity) असलेल्या सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचं लग्न नुकतंच थाटामाटात झालं. पुण्याजवळ ढेपेवाड्यात झालेलं हे लग्न अतिशय देखणं होतं. आता या लग्नातील काही एक्सक्लुझिव फोटोज (exclusive photos) समोर आले आहेत. सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नातील (Siddharth Chandekar and Mitali Mayekar Wedding) फोटोज सोशल मीडियावर व्हायरल (photos viral on social media) झाले. दोघांनी आपापल्या अकाऊंटवरून शेअर केलेले फोटोज आणि व्हिडिओज अतिशय सुरेख आणि प्रेक्षणीय होते. चाहत्यांनी या फोटो आणि व्हिडिओजना उचलून धरलं. मात्र अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेलं नव्हते. त्यातल्याच एक्सक्लुझिव फोटोजचा सुंदर कोलाज बनवून त्याचा व्हिडिओ राजश्री प्रॉडक्शन्सनं (Rajshri Productions) टाकला आहे. या फोटोजमध्ये अतिशय पारंपरिक पद्धतीनं (traditional wedding) झालेल्या या लग्नात मितालीनं हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा मितालीचा लूक एकदम लक्षवेधी होता. सिद्धार्थनं जांभळ्या रंगाचचा रंगाचा कुर्ता आणि धोतर नेसलं होतं. या सोहळ्याला मराठी सिने आणि कलाविश्वातील अनेक सेलेब्रिटी आले होते. अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat), अभिज्ञा भावे, पूजा सावंत (Pooja Sawant), भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी लग्न खूपच ग्लॅमरस झालं. युट्युबवरचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांना हे खास फोटोज पसंतीला आले आहेत. दोघांचे आई-वडील, मित्रमैत्रिणी यांच्यासोबतच अनेक भावूक क्षण या युट्युब व्हिडिओत कैद झाले आहेत. मंद, रोमँटिक संगीताचीही (music) या व्हिडिओला जोड दिलेली आहे. हेही वाचा ठरलं! दिया मिर्झा दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, या उद्योगपतीशी बांधणार लग्नगाठ लग्न ठरल्यापासून आपल्या आयुष्यातील अनेक अपडेट्स आवर्जून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हळदीचे, मेहंदीचे आणि संगीत सेरिमनीचे (Mehandi and Sangeet ceremony) फोटोज व्हायरल झाले आहेत. फोटोमधल्या दोघांच्या केमिस्ट्रीची मोठीच चर्चा चाहत्यांमध्ये होते आहे.
First published:

Tags: Siddharth chandekar, Youtube

पुढील बातम्या