JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ममत्व आणि कर्तव्याचा संगम; स्वरानं शेअर केला वर्दीतील झाशीच्या राणीचा व्हिडीओ

ममत्व आणि कर्तव्याचा संगम; स्वरानं शेअर केला वर्दीतील झाशीच्या राणीचा व्हिडीओ

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं देशभरात लॉकडाउन जारी करण्यात आलं. लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळं पोलिसांवरील कामाचा ताण वाढला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 7 मार्च: कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या संक्रमणामुळं देशभरात लॉकडाउन जारी करण्यात आलं. लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळं पोलिसांवरील कामाचा ताण वाढला. विशेष करुन महिला पोलिसांना तर घर सांभाळून अतिरिक्त कामं करावी लागत आहेत. (Women traffic Police Officer) अशा प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे आपलं काम चोख बजावणाऱ्या एका महिला वाहतूक पोलीसाचा व्हिडीओ अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhaskar) शेअर केला आहे. उन्हाळ्याची चाहुल लागली असून अंगाला भीषण चटके जाणवायला सुरूवात झाली आहे. असं असताना आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन या वाहतूक पोलीस अधिकारी आपली सेवा बजावत आहे. या महिलेचं नाव प्रियांका असं आहे. त्या चंदिगढ येथील सेक्टर 23-24 मध्ये वाहतूक नियंत्रित ठेवण्याचं काम करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ अभिनेत्री स्वरा भास्करनं शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या

अवश्य पाहा - आनंद गगनात मावेना! कोरोनाची लस घेतल्यानंतर अशी होती तरुणाची पहिली प्रतिक्रिया…पाहा VIDEO हातात चिमुकलं बाळ घेवून ऊन, वारा, वाहनांचा कर्कश आवाज, प्रदुषण अशा सर्व समस्या असताना ही महिला शांतपणे आपलं कर्तव्य बजावत आहे. तिच्या या कर्तृत्वाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. पण अनेकांनी पोलीस प्रशासनातील दुरावस्थेवर टिका केली आहे. एका वापरकरत्याने प्रतिक्रिया देत, संबंधित महिलेची ड्युटी वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये लावायला हवी, जेणेकरून तिची आणि बाळाची तारांबळ उडणार नाही. कारण संबंधित महिला जरी तिचं कर्तव्य पार पाडत असली तरी बाळाला विनाकारण उन्हात राहावं लागत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या