मुंबई, 6 मार्च : कोरोना ओसरतो आहे असं चित्र असतानाच एकाएकी पुन्हा वाढायला लागला. यामुळं लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनाची लस नसल्यानं याआधी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र आता अनेक परीक्षणाच्या टप्प्यांतून जात लस नागरिकांपर्यंत उपलब्ध झाली आहे. (Corona vaccine)
जगभरात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. यात कॅनडामध्ये डान्सर गुरदीप पंधेर यानंही २ मार्च रोजी कोरोनाची लस घेतली. त्यानं घेतलेला हा लसीचा पहिला डोस होता. हा डोस घेतल्यावर त्यानं आगळ्याच शैलीत आनंद व्यक्त केला. (corona vaccine dance video)
खरं पाहता लस घेतल्यावर सामान्य लोक घरी जाऊन आराम करतात. मात्र गुरदीपला कोरोनाची लस दिली गेली तेव्हा त्यानं भन्नाट गोष्ट केली. गुरदीपनं चक्क बर्फ जमलेल्या तलावावर जाऊन भांगडा केला. त्याच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. लोकांना त्याची ही अनोखी अदा खूपच आवडते आहे. (dancer did bhangda Canada viral video)
It has been four days since I received the Covid-19 vaccine. Many folks have been messaging me to know how I've been feeling now. Therefore, I decided to re-visit the same frozen Lake Laberge to do my positive & joyous Bhangra dance, which explains all. Have a smileful day! pic.twitter.com/UZe2dTGETC
— Gurdeep Pandher of Yukon (@GurdeepPandher) March 5, 2021
ट्विटरवर व्हायरल झाला व्हिडिओ
गुरदीपनं स्वतःच ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्स आणि फॉलोअर्सना सांगितलं, की लस टोचून घेतल्यानंतर तो सरळ युकोन इथं गोठलेल्या तलावावर गेला. आनंद व्यक्त करण्यासाठी त्यानं एकदम मनापासून भांगडा केला. (bhangda after corona vaccination)
हेही वाचा VIDEO : पेट्रोल खरेदीसाठी तरुण पोहचला पंपावर; परतला तेव्हा अंगावर कपडेही नव्हते
गुरदीप यांच्या पोस्टमध्ये 55 सेकंदांचा व्हिडिओ आहे. यात तो गोठलेल्या तलावावर भांगडा करताना दिसतो आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये गुरदीपनं लिहिलं आहे, काल संध्याकाळी मला लसीचा पहिला डोस मिळाला, तेव्हा मी आनंद व्यक्त करायला गोठलेल्या तलावावर गेलो. आणि तिथं भांगडा केला. (Canadian dancer bhangda video)
हेही वाचा VIDEO: SexyBack वर नाचणाऱ्या या डॉक्टरांनी 9 दिवसांत केल्या 130 डिलिव्हरी
गुरदीपचा हा व्हिडिओ ट्विटरवर दहा लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. सोबतच गुरदीपच्या भांगड्याचं कौतुकही करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Dance video, Viral video.