JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / परदेशातही सुशांतला न्याय देण्याची मागणी; 'या' देशात #SushantJusticeNowचे झळकले बॅनर्स

परदेशातही सुशांतला न्याय देण्याची मागणी; 'या' देशात #SushantJusticeNowचे झळकले बॅनर्स

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या मृत्यूचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही. भारतातच नव्हे तर परदेशातही सुशांतला न्याय मिळावा यासाठी मागणी करण्यात येत आहे. बॅनर्स आणि ट्विटर ट्रेंडच्या माध्यमातून चाहते आपली मागणी व्यक्त करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलंबो,11 ऑक्टोबर: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या हरहुन्नरी अभिनेत्याने अवघ्या 34व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूचा तपास अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण अद्यापही कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत सीबीआय (CBI) पोहोचलेलं नाही. त्याचं कुटुंब अजूनही सुशांत गेल्याच्या दु:खातून सावरु शकलेलं नाही, असंच दिसत आहे. सुशांतने नेमकी आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुशांतची बहीण करत आहे. श्रीलंकेतही सुशांतला न्याय देण्याची मागणी सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची बहीण श्वेता सिंह कीर्ती (Sweta Singh Kirti) नेहमीच सोशल मीडिया (Social Media)वर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त त्याचं कुटुंबच नाही तर संपूर्ण जगातले त्याचे फॅन्स एकत्र येत आहेत. परदेशातही यावेळी ‘सुशांत जस्टीस नाऊ’ (Sushant Justice Now) लिहलेले हॅशटॅग, बॅनर्स प्रसिद्ध होत आहेत. श्रीलंकेमध्येही अशाप्रकारची बॅनर्स झळकलेली दिसून आली. यावर सुशांतची बहीण श्वेताने ट्विट करत ‘थँक यू श्रीलंका’ असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

श्रीलंकेच्या रस्त्यांवर ‘सुशांत जस्टिस नाऊ’ असं लिहलेली बॅनर्स झळकली आहेत. श्रीलंकेतले चाहतेदेखील सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत आहेत. तसंच गेल्या 2 दिवसांपासून #CBIStartArrestInSSRCase हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ट्विटरवरचे अनेक युझर्स सुशांतला न्याय देण्याची मागणी करत आहेत. सुशांत सिंह आत्महत्येचा तपास सर्वात आधी पोलिसांकडे देण्यात आला होता. सध्या या प्रकरणाचा तपास CBI करत आहे. सुशांतच्या तपासामध्ये ड्रग कनेक्शनही समोर आलं आहे. ड्रग कनेक्शनसंदर्भात अनेक बड्या अभिनेत्री आणि ड्रग पेडलर्सची चौकशी करण्यात आली. पण अद्यापही सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध लागलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या