मुंबई**,** 17 फेब्रुवारी: सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणाच्या निमित्तानं सिनेसृष्टीतील घराणेशाही हा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून बाहेर पडला आहे. परिणामी कलाकारांच्या मुलांवर सध्या जोरदार टीका होत आहे. दरम्यान या घराणेशाहीच्या वादावर आता अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या मुलीनं देखील इतर कलाकारांप्रमाणेच स्ट्रगल केला आहे असं त्या म्हणाल्या. सुप्रिया एक नवी मालिका घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी मालिकेचं नाव जननी असं आहे. या मालिकेच्या निमित्तानं पिपींगमून ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “कलाकारांच्या मुलांना ओळखीमुळं काम मिळत हे काही अंशी खरं आहे. अन् यामध्ये त्या मुलांची काहीही चूक नसते. कुठल्या घरात जन्म घेणं हे त्या बाळाच्या हातात नसतं. परंतु मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेणं हे मात्र त्या मुलांच्या हातात असतं. त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं ही अपेक्षा असते. जर तसं नाही तर प्रेक्षक आपोआपच तुम्हाला नाकारतात. मग कितीही मोठी ओळखी असली आणि कितीही प्रमोशन केलं तरी प्रेक्षक तुमची कलाकृती पाहात नाहीत. माझ्याही मुलीला बराच स्ट्रगल करावा लागला आहे. आणि ती अजूनही स्ट्रगल करत आहे. तिला याविषयी काहीच हरकत नाही. मला असं वाटतं की मिळणारं काम कसंही मिळतच आणि न मिळणार काम काही करून हातातून निसटून जातं. हे सगळं नशीबावर अवलंबुन आहे.” अवश्य पाहा - सई-प्रसाद करणार नाहीत परीक्षण; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नवा ट्विस्ट मनोरंजन विश्वातील घराणेशाही या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर वादळ सुटलेलं पाहायला मिळालं होतं. सुप्रिया आणि सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकरही या मनोरंजन विश्वात तिची वेगळी ओळख मिळवताना दिसतेय. यातच सुप्रिया पिळगांवकर यांनी या घराणेशाही मुद्द्यावर केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं ठरतंय.