जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सई-प्रसाद करणार नाहीत परीक्षण; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नवा ट्विस्ट

सई-प्रसाद करणार नाहीत परीक्षण; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नवा ट्विस्ट

सई-प्रसाद करणार नाहीत परीक्षण; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नवा ट्विस्ट

हा शो लवकरच 300 भागांचा टप्पा गाठणार आहे. या निमित्तानं सई आणि प्रसाद एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई**, 17** फेब्रुवारी: ‘जीवनात कितीही टेन्शन आलं तरी घबरु नका हा कार्यक्रम पाहा आणि ताण विसरा’ असं म्हणत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा शो लवकरच 300 भागांचा टप्पा गाठणार आहे. या निमित्तानं सई आणि प्रसाद एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये (Maharashtrachi Hasya Jatra) परिक्षकांच्या भूमिकेत कार्यरत आहेत. हे कलाकार इतर कलाकारांनी सादर केलेल्या स्कीटचं परिक्षण करतात. मात्र 300 व्या भागाच्या निमित्तानं सई आणि प्रसाद केवळ स्किट पाहण्याऐवजी ते देखील इतर विनोदवीरांमध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

जाहिरात

समीर, विशाखा, प्रसाद खांडेकर आणि निखिल बने यांच्या स्कीटमध्ये सई आणि प्रसाद हेही सहभागी होणार आहेत. इतिहास पोटतिडकीनं समजावून सांगणारा गाईड समीर, कुटुंबासह फिरायला आलेले प्रसाद खांडेकर, निखिल बने आणि विशाखा यांच्या या सहलीमध्ये प्रसाद आणि सई हेही दांपत्य म्हणून सहभागी होणार आहेत. या सगळ्या कलाकाराचं रसायन चांगलंच जमून आलं आहे. हे सादरीकरण प्रेक्षकांना कसं वाटतं, हे बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात