JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : सलमानने चाहत्यांना दिली Manzar ची भेट; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

VIDEO : सलमानने चाहत्यांना दिली Manzar ची भेट; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

नुकतंच सलमान अलीचं (Salman ali) नवं गाणं ‘मंजर’ (Manzar) प्रदर्शित झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 एप्रिल- ‘इंडियन आयडल 10’ (indian idol 10) मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला स्पर्धक सलमान अली (salman ali) आज सर्वांच्याच परिचयाचा आहे. सलमान इंडियन आयडलच्या त्या पर्वाचा विजेतासुद्धा (indian idol 10 winner) झाला होता. सलमानने आपल्या खणखणीत आवाजाने चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सलमानने काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानसाठी ‘दबंग 3’ (dabang 3) या चित्रपटात आपला आवाज दिला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सलमान आपल्या नव्या गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच सलमान अलीचं नवं गाणं ‘मंजर’ (Manzar) प्रदर्शित झालं आहे. सलमानन हे गाणं फक्त गायिलं नाही तर त्यात अभिनयसुद्धा केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मंजर या गाण्यात सलमानसोबत विपिन अनेजा यांचा आवाजसुद्धा ऐकायला मिळणार आहे. हे गाणंसुद्धा आपल्या मनाला भावणारं असंच आहे. हे गाणं गिल्बर्ट चेटीयारने लिहिलं आहे. आणि त्याला संगीत अंशुल शर्माने दिलं आहे. देवांश पटेलने याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रदर्शित होताच गाण्याला 40 हजारांहून जास्त लाईक्स आलेले आहेत. हे गाणं सध्यस्थितीवर आधारित आहे.

चार दिवसांपूर्वीच सलमान अलीचं ‘नैना मिले’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. यामध्ये सुद्धा सलमानने गाण्यासोबत अभिनयसुद्धा केला आहे. तसंच यामध्ये सलमान सोबत मॉडेल ख़ुशीसुद्धा दिसली होती. या गाण्यालासुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याला 6 लाखांच्यावर लोकांनी बघितलं आहे. अगदी आत्म्याला भिडणाऱ्या सलमानच्या आवाजाला लोक मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. हे गाणं मोठ्या प्रमाणात शेयरसुद्धा केलं जातं आहे. हे वाचा -  नववी नापास ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज; असा आहे गायक आनंद शिंदेंचा खडतर प्रवास ) सलमान काही वर्षांपूर्वी ‘लिटल चॅम्प’मध्ये सुद्धा सहभागी झाला होता. सध्या सलमान अली झी टीव्हीवरील ‘इंडियन प्रो म्युझिक लीग’ मध्ये दिसून येत आहे. यामध्येसुद्धा तो आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आहे. सलमानला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्याच्या कुटुंबामध्ये पारंपरिक संगीताची प्रथा आहे. कुटुंबातूनच त्याला हा वारसा मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या