मुंबई, 20 एप्रिल- महाराष्ट्राचे उत्कृष्ट गायक (singer) आनंद शिंदे (anand shinde) यांचा आज वाढदिवस (birthday) आहे. मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलिवूडपर्यंत त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत. आनंद शिंदे हे लोकगीतांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांना आपल्या वडिलांकडून हा वारसा मिळाला आहे. प्रल्हाद शिंदे (pralhad shinde) हे त्यांचे वडील (father) आहेत. फक्त आनंद शिंदेच नव्हे तर त्यांच्या तब्बल पाच पिढ्या या क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. आज त्त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या आयुष्याच्या खडतर प्रवासावर एक दृष्टीक्षेप टाकूया. आनंद शिंदे यांचा जन्म 21 एप्रिल 1965 मध्ये झाला आहे. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या ठिकाणचे आहेत. लहानपणी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र तेव्हापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. ते आपल्या वडिलांसोबत गाण्यांच्या कार्यक्रमाला जात असत.
अभ्यासात त्यांना फारशी रुची नव्हती. त्यामुळे तिथं त्यांचं मन कधीचं रमलं नाही आणि म्हणूनचं ते नववी नापास झाले होते. त्यानंतर त्यांनी शाळेला रामराम ठोकला आणि तबला वादन करण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांचे भाऊ मिलिंद शिंदेसुद्धा गाणी गात असत. एखाद्या कारणाने वडिलांना गाणं गाणं शक्य नसेल तर मिलिंद आणि आनंद हे दोघं तो वसा चालवत असत. यातूनच ते घडत गेले. हे वाचा - सलमान खानच्या चाहत्यांसाठी GOOD NEWS, ईदला ‘राधे’ येणार भेटीला मात्र एक गायक म्हणून त्यांना हवी तशी ओळख मिळालेली नव्हती. असं म्हटलं जात की त्यांच्या आई रुक्मिणीबाई यांनी प्रसिद्ध गायक तसंच संगीतकार आणि त्यांचा पुतण्या विठ्ठल शिंदे यांच्याकडे विनंती केली. त्यांनी आनंदला दोन गाणी दिली. मात्र आनंद शिंदेंना खरी ओळख मिळाली ती ‘नवीन पोपट हा’ या गाण्याने. हे गाणं अक्षरशः लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. हे वाचा - **’**आम्ही लठ्ठ आहोत म्हणून…’; Body Shaming वर अक्षया नाईकची सणसणीत चपराक आपल्या कारकीर्दीमध्ये आनंद शिंदे यांनी 1000 हून अधिक गाण्यासोबतच 250 चित्रपटात पार्श्वगायनसुद्धा केलं आहे. त्यांची भीमगीतेसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. प्रत्येक आंबेडकर जयंतीला त्यांची गाणी असतातच. आनंद यांचं लग्न अगदी लहान वयात विजया यांच्याशी झालं होतं. त्यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी तीन मुले आहेत. आदर्श हासुद्धा एक प्रसिद्ध गायक आहे.

)







