JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘लशींचा अतिरिक्त साठा भारतीयांसाठी का नाही?’ अभिनेत्रीचा उद्धव ठाकरेंना सवाल

‘लशींचा अतिरिक्त साठा भारतीयांसाठी का नाही?’ अभिनेत्रीचा उद्धव ठाकरेंना सवाल

अतिरिक्त साठा असतानाही ही लस भारतीयांसाठी उपलब्ध का होत नाही? असा सवाल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मालक अदार पूनावाला यांना केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई**,** 17 फेब्रुवारी: करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं जगभरातील देश सध्या त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड लशींना इतर देशांना देखील निर्यात करण्यात निर्णय घेतला आहे. जवळपास दोन लाख लशी कॅनडा, ब्राझिल आणि इतर आफ्रिकन देशांना निर्यात केल्या जाणार आहेत. मात्र कंपनीच्या या निर्णयावरुन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवाल (Simi garewal) संतापल्या आहेत. अतिरिक्त साठा असतानाही ही लस भारतीयांसाठी उपलब्ध का होत नाही? असा सवाल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मालक अदार पूनावाला यांना केला आहे.  (india export vaccine to brazil) नेमकं काय म्हणाल्या सिमी ग्रेवाल**?** “आपल्याकडे कोविशील्ड लशीचा अतिरिक्त साठा उपलब्ध आहे त्यामुळे आपण ही लस आता कॅनडासारख्या देशांना निर्यात करतोय. पण ही लस अद्याप भारतीयांना खरेदी करण्यासाठी बाजारात उपलब्ध झालेली नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन सिमी ग्रेवाल यांनी आपला नाराजी व्यक्त केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवश्य पाहा -  एका ट्विटनं माजवली खळबळ; मोदींना ‘गो बॅक’ म्हणणारी ओविया आहे तरी कोण?

संबंधित बातम्या

डोसची सरकारी आणि खासगी किंमत इतकी असेल पूनावाला म्हणाले, पहिले 100 मिलियन डोस हे भारत सरकारला विकले जातील. ज्याची खास किंमत 200 रुपये (2.74 डॉलर) प्रति डोस असेल. त्यानंतर या डोसची किंमत वाढेल. खासगी बाजारात लसीची किंमत एक हजार रुपये प्रति डोस असेल. भारत सरकारसोबत करार अंतिम झाल्यानंतर 7 ते 10 दिवसांत भारतातील राज्यांना गरजेप्रमाणे लस देण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या