JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रिया चक्रवर्तीच्या भावाला 90 दिवसांनंतर जामीन मंजूर; शौविकला NPDS कोर्टाकडून दिलासा

रिया चक्रवर्तीच्या भावाला 90 दिवसांनंतर जामीन मंजूर; शौविकला NPDS कोर्टाकडून दिलासा

ड्रग केस प्रकरणी अटकेत असलेल्या शौविक चक्रवर्तीला (showik-chakraborty) दिलासा मिळालेला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. तपासात समोर आलेल्या ड्रग अँगलमुळे रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती अटकेत होता. शौविकला मुंबईच्या NPDS कोर्टाकडून बेल मिळाली आहे. रिया आणि शौविक दोघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पण रियाला याप्रकरणामध्ये जामीन मिळाला होता. शौविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आला होता. शौविकला 3 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. आता तब्बल 3 महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) 29 दिवसांनी काही अटीशर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला होता. रियाचा जामीन 7 ऑक्टोबर रोजी मंजूर करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

मात्र तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. याप्रकरणी अटकेत असणाऱ्या सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील खंडपीठाने मंजूर केला होता. तर शौविकबरोबर अब्दुल बसीथ परिहारचा जामीन अर्थ फेटाळण्यात आला आहे. NDPS कायद्याच्या विविध तरतुदींनुसार त्यांच्याविरोधात एनसीबीने खटला दाखल केला होता. आता शौविकचा जामिन मंजूर झाल्यामुळे त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी जेवव्हा एनसीबी रिया, तिचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेशच्या बँक खात्याची छाननी करत होते, तेव्हाच त्यांना रियाच्या कार्डवरून झालेला एक आर्थिक व्यवहार सापडला होता. रियाच्या कार्डवरून एका ड्रग डिलराला बड म्हणजे गांज्याचे पैसे देण्यात आले होते. त्यावरुन त्यांनी शौविकभोवती फास आवळला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या