मुंबई, 20 एप्रिल- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सौम्या सेठ(somya seth) बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. ‘नाव्या- नयी धडकन नये सवाल’ (Navya-nayi dhadkan, naye sawal)या मालिकेतून नव्याच्या(navya) रुपात ती घरघरात पोहचली होती. त्यांनतरही तिनं काही मालिकांत काम केलं. मात्र काही वर्षांनंतर तिने अभिनयसृष्टी आणि देश दोन्ही सोडलं. सौम्या लग्नं करून विदेशात स्थायिक झाली आहे. सौम्या ही बॉलीवूड अभिनेता गोविंदाची(Govinda) भाची आहे. सौम्या सतत आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे खुलासे करत असते. मात्र यावेळी तिनं केलेला खुलासा सर्वांसाठीचं मोठा धक्का होता. सौम्या आयुष्यातील चढ उतारांबद्दल मनमोकळे पणाने बोलली, ती म्हणाली की ती ज्यावेळी गर्भवती होती. तेव्हा तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सौम्यानं म्हटलं आहे, जेव्हा ती आयुष्यतील या कठीण प्रसंगातून जातं होती. तेव्हा तिला तिच्या आई वडिलांनी मोठा आधार दिला होता.
तसेच सौम्या म्हणते 2017 मध्ये मी गर्भवती होते. आणि मी माझा आईवडिलांच्या जवळ व्हर्जिनियाला जाण्याआधी आत्महत्या करण्याचे मार्ग शोधत होते. मात्र त्यावेळी मला माझा आई वडिलांनी धीर दिला. आणि मला या सर्वातून बाहेर पडण्यास मदत केली. त्यावेळी मी आरशासमोर उभी राहिले मात्र मला स्वतःला ओळखणं सुद्धा कठीण होतं. कारण मी पूर्णपणे जखमांनी भरलेले. मी गर्भवती असूनसुद्धा कित्येक दिवस जेवत नव्हते. जेव्हा जेव्हा मी स्वतःला बघत मला आत्महत्या करावीशी वाटत. (अवश्य वाचा: मुंबई फिरायला आली अन् झाली अभिनेत्री; पाहा रतन राजपूतचा अजब प्रवास ) सौम्याने 2017 मध्ये अरुण कपूर या व्यक्तीशी लग्नं केलं होतं. मात्र सौम्याला या लग्नातून दुखचं मिळाल्याचं तिनं बऱ्याचवेळा सांगितलं आहे. सौम्या कौटुंबिक हिंसाचारला बळी पडली होती. तिनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल खुलासा केला होता. सौम्याने 2019 मध्ये आपल्या पतीशी घटस्फोट घेतला आहे. ती सध्या यूएसएमध्ये आपल्या मुलांसोबत राहते.