मुंबई फिरायला आली अन् झाली अभिनेत्री; पाहा रतन राजपूतचा अजब प्रवास

मुंबई फिरायला आली अन् झाली अभिनेत्री; पाहा रतन राजपूतचा अजब प्रवास

खरं तर तिला एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करायचं होतं. परंतु गंमत म्हणून दिलेल्या त्या ऑडिशनमुळं तिचं आयुष्य एकाएकी बदललं.

  • Share this:

मुंबई 20 एप्रिल: ‘संतोषी मा’ (Santoshi Maa) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रतन राजपूत (Ratan Rajput) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अष्टपैलू अभिनय शैलीमुळं तिनं कमी कालावधीत स्वत:चं असं एक स्वतंत्र स्थानं अभिनयसृष्टीत निर्माण केलं आहे. साधी सोज्वळ सून ते ग्लॅमरस चुलबुली तरुणी अशा विविध प्रकारच्या भूमिका या अभिनेत्रीनं साकारल्या आहेत. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज मालिकांमुळं इतकी प्रसिद्धी मिळवणाऱ्या रतनला कधीच अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. खरं तर तिला एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करायचं होतं. परंतु गंमत म्हणून दिलेल्या त्या ऑडिशनमुळं तिचं आयुष्य एकाएकी बदललं.

रतनचा जन्म 20 एप्रिल 1987 साली बिहारमधील एका बनिशपुर या गावात झाला होता. लहानपणापासूनच तिला मुंबईचं प्रचंड आकर्षण होतं. तिचं आयुष्य खेड्यामध्ये गेल्यामुळं तिनं कधीही मोठमोठ्या इमारती पाहिल्या नव्हत्या. त्यामुळं तिला इमारती व मल्टि नॅशनल कंपनी यांचं प्रचंड आकर्षण होतं. अन् या आकर्षणापोटीच ती एकेदिवशी मुंबईत आली होती. मुंबईत ती आपल्या मावशीच्या घरी आली होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणीला अभिनयाची आवड होती. अन् ती काम मिळवण्यासाठी विविध ठिकाणी ऑडिशन्स वगैरे देत असे. असंच एकदा ऑडिशन पाहण्यासाठी रतन देखील तिच्यासोबत गेली होती.

अवश्य पाहा - छोटा राजनमुळं संपलं ममता कुलकर्णीचं करिअर; द्यायची निर्मात्यांनाच धमक्या

त्यावेळी रावण या मालिकेचं ऑडिशन सुरु होतं. कास्टिंग डिरेक्टरनं रतनंला पाहिलं अन् पाहताच क्षणी तिनं मालिकेत काम करावं अशी इच्छा व्यक्त केली. अखेर डिरेक्टरच्या आग्रहाखातर तिनं ऑडिशन दिलं. तिनं चंद्रनखा या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिलं होतं. तिचा अभिनय फारसा चांगला नव्हता. पण त्या गेटअपमध्ये मात्र उत्तम दिसत होती. शिवाय तिला डायलॉग्ज देखील फार नव्हते. त्यामुळं तिची निवड करण्यात आली. परंतु या मालिकेनं तिचं आयुष्य बदललं. या मालिकेनंतर तिला महाभारत, संतोषी मा, दिल से दिया वचन, राधा की बिटिया कुछ कर दिखाएगी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे प्रत्येक मालिकागणीक तिनं देखील आपल्या अभिनयात प्रचंड सुधारणा केली. आज ती एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Published by: Mandar Gurav
First published: April 20, 2021, 9:57 AM IST

ताज्या बातम्या