JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचं Cardiac Arrest मुळे निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचं Cardiac Arrest मुळे निधन

किशोर नांदलस्कर (Kishor Nandlaskar), अभिनेता विवेक (Vivek), संगीतकार जोडी नदीम श्रवण (Nadim-Shravan) मधील श्रवण राठोड (Shravan Rathod) या दिग्गजांनंतर आता आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता अमित मिस्त्री (Amit Mistri) याचं देखील आज निधन झालं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 एप्रिल: 2020 हे वर्ष सर्वांसाठीच खूप कठीण राहिलं होतं. यावर्षात चित्रपटसृष्टीने तर अनेक दिग्गजांना गमावलं आहे. मात्र 2021 सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती करताना दिसत आहे. अनेक कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. किशोर नांदलस्कर (Kishor Nandlaskar), अभिनेता विवेक (Vivek), संगीतकार जोडी नदीम श्रवण (Nadim-Shravan) मधील श्रवण राठोड (Shravan Rathod) या दिग्गजांनंतर आता आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता अमित मिस्त्री (Amit Mistri) याचं देखील आज निधन झालं आहे. या बातमीने बॉलिवूडला पुन्हा एक धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या

अमित मिस्त्री अभिनय सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा होता. त्यांने गुजराती आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  कार्डियाक अरेस्टमुळे त्याचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अमितचा अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटांत अभिनय गाजला आहे. नुकतंच त्याने नसरुद्दिन शहा यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बंदिश बँडिट्स’ या वेबसिरीज मध्ये काम केलं होतं. त्यात अमित एका महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (हे वाचा- बॉलिवूड पुन्हा हादरलं; प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचा कोरोनामुळे मृत्यू ) अमित मुंबईमध्ये आईबरोबर राहत असे. पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला होता. अमित मिस्त्रीने चित्रपटासोबतच थिएटरमध्ये सुद्धा काम केलं आहे. तसेच त्याने क्या कहना, 99, यमला पगला दिवाना, एक चालीस की लास्ट लोकल, शोर इन द सिटी, भूत पोलीस अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमितच्या निधनामुळे बॉलिवूडने पुन्हा एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या