JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आजोबांनी केलं होतं लैंगिक शोषण, लहान बहिणीलाही सोडलं नाही,' अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट

'आजोबांनी केलं होतं लैंगिक शोषण, लहान बहिणीलाही सोडलं नाही,' अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोन (Sharon Stone) ही नेहमी तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध आहे. शेरॉन स्टोननं एक नवा गौप्यस्फोट केला असून त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. '

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोन (Sharon Stone) ही नेहमी तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध आहे. शेरॉन स्टोननं एक नवा गौप्यस्फोट केला असून त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘मला आणि माझ्या बहिणीला लहानपणी लैंंगिक शोषणाचा सामना करावा लागला,’ असा गौप्यस्फोट तिनं केला आहे. स्टोनने तिचे आजोबाच या प्रकरणात दोषी असल्याचा दावा केला आहे. ‘द ब्युटी ऑफ लिविंग ट्वाईस’ (The Beauty of Living Twice) हे शेरॉनचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी तिनं हा दावा केला आहे. काय म्हणाली शेरॉन? ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार शेरॉन 11 वर्षांची होती, त्यावेळी तिचे आजोबा क्लॅरेंस लॉसन यांनी तिचं शारीरिक शोषण केलं होतं. आजोबा फक्त माझं नाही, तर माझी बहीण केलीचंही शोषण करत असत. या कामामध्ये आजी त्यांची मदत करत असे,’ असं शेरॉन हिने म्हटलं आहे. आजी दोन्ही बहिणींना आजोबांसोबत एका खोलीत बंद करत असे. अनेक दिवस आम्ही त्यांचा त्रास सहन केला. आजोबांच्या मृत्यूनंतरच आमची यामधून सुटका झाली. आजोबांचा मृतदेह पाहिल्यानंतर आम्ही बहिणींनी सुटकेचा निश्वास सोडला.’ असंही शेरॉन हिनं या पुस्तकात म्हटलं आहे. ( वाचा :    बालिका वधू फेम ‘आनंदी’ ने उरकलं गुपचूप लग्न?  ) या पुस्तकामध्ये शेरॉननं तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. चित्रपट निर्मात्यांनी देखील आपल्याकडे भलती मागणी केली होती, असा दावाही तिने केला आहे. शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून ‘बेसिक इंस्टिंक्ट’ (Basic Instinct) हा तिचा चित्रपट चांगलाच गाजला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या