मुंबई, 22 एप्रिल : सध्या कोरोनाच्या (coronavirus) रुपात देशावर मोठं संकट ओढवलं आहे. देशावर दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होतं चालला आहे. महाराष्ट्रात (maharashtra) तर सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackrey) यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनचा (lockdown in maharashtra) मार्ग अवलंबला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या शूटिंगवर_(shooting)_ सुद्धा बंदी आली आहे. त्यामुळे कलाकार मंडळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर जात आहेत. दररोज एकापाठोपाठ एक कलाकार एयरपोर्टवर दिसून येत आहेत. नुकतंच शाहरुख खानची (shahrukh khan wife) पत्नी गौरी (gauri khan) आणि मुलगा आर्यनसुद्धा (aaryan khan) एयरपोर्टवर दिसून आला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांना देश सोडून जाताना पाहून नेटिझन्स त्यांच्यावर संतापले आहेत.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार गौरी खान आपली मुलगी सुहानाकडे न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी तिच्यासोबत आर्यनसुद्धा होता. मुंबई एयरपोर्टवर त्याना माध्यमांनी टिपलं. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विरल भयानीच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हे व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ पाहून लोक गौरी-आर्यनवर भडकले आहेत आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युझरने म्हटलं की, ‘टायटॅनिकमध्येसुद्धा असंच झालं होतं. श्रीमंत लोकांनी आधी पळ काढला होता’. तर दुसऱ्या युझरने म्हटलं, ‘बस्स कलाकारांचं पळ काढणं सुरू आहे’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘सगळे पळा मुंबई सोडून’. तर एकाने म्हटलं ‘तुम्ही परत येऊच नका’. ‘पळा-पळा, तसेच निघा’, ‘हे पाहणं खूपच लाजीरवाण आहे’, ‘तुम्हा लोकांना या कठीण काळातसुद्धा फक्त सुट्टी हवी’, ‘हे दु:खद आहे की संपूर्ण बॉलिवूड पळ काढत आहे’, ‘पैसा तुम्ही एखाद्या गरज असणाऱ्याला देऊ नका फक्त सुट्टीवर उडवा’, अशा अनेक कमेंट्स यावर येत आहेत. लोक सोशल मीडियाद्वारे आपला रोष व्यक्त करत आहेत. हे वाचा - Dance Diwane 3 च्या सेटवर कोरोनाचा हाहाकार! धर्मेश नंतर राघवही Corona Positive ) कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिघडताच अनेक कलाकारांनी विविध देशात प्रस्थान केलं आहे. ज्या कलाकारांना लोक आपला हिरो मानतात तेच लोक आज देशाला या स्थितीत सोडून पळ काढत आहेत. हे पाहून लोकांचा राग अनावर होतं आहे. तर दुसरीकडे सोनू सूदसारखा अभिनेता कोरोनाची लागण होऊनसुद्धा नागरिकांना मदत करत आहे आणि मदतीसाठी विनंतीही करत आहे. तसंच नागार्जुन, रजनीकांत, प्रभास यांसारखे कलाकारसुद्धा या काळात मदतीचा हात पुढे करत आहेत.