Dance Diwane 3 च्या सेटवर कोरोनाचा हाहाकार! धर्मेश नंतर राघव जुयालही Corona Positive

Dance Diwane 3 च्या सेटवर कोरोनाचा हाहाकार! धर्मेश नंतर राघव जुयालही Corona Positive

राघवने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहलं आहे, ‘ताप आणि खोकला आल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करून घेतली, आणि आत्ता माझा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. माझा संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्या. आणि कोरोना चाचणी करून घ्या.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल- कोरोनाचा (Coronavirus) विळखा दिवसेंदिवस घट्ट होतं चालला आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार अनेकजण कोरोनाला बळी पडत आहेत. नुकताच टीव्हीवरील ‘डान्स दिवाने 3’(Dance Diwane 3) फेम होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) याला कोरोनाची लागण (covid 19 positive) झाल्याची माहिती समोर आहे. या शोमध्ये माधुरी दीक्षित (Madhuri dixit) देखील परीक्षकाच्या भूमिकेत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी याच कार्यक्रमातील परीक्षक धर्मेश येलांडेला (Dharmesh Yelande) सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आत्ता राघव जुयालने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

राघवने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहलं आहे, ‘ताप आणि खोकला आल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करून घेतली, आणि आता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझा संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्या आणि कोरोना चाचणी करून घ्या. सर्व प्रोटोकॉल पाळा. सतर्क राहा आणि सुरक्षित राहा’. अशा आशयाची पोस्ट राघवने केली आहे. राघवने ही पोस्ट केल्यानंतर चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. आणि काळजी घेण्यास ही सांगत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

राघव जुयाल सध्या ‘डान्स दिवाने 3’ मध्ये होस्ट आहे. त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरने या कार्यक्रमाला यशाच्या शिखरावर नेण्यास मदत केली आहे. राघव हा एक उत्तम डान्सर आहे. आहे त्याने डान्सिंग मधूनचं आपलं करीयर सुरु केलं आहे. त्याच्या स्लो मोशन या डान्स प्रकारचे तर सर्वजण अक्षरशः वेडे आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित या कार्यक्रमाची परीक्षक आहे. त्याचबरोबर तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे सुद्धा यात परीक्षक आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी धर्मेशलाही कोरोनाची लागण झाल्याने तो आयसोलेशनमध्ये आहे.

(हे वाचा: या' लोकांना मोफत कोरोना लस देणार; प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली लसीकरणाची जबाबदारी)

‘डान्स दिवाने 3’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सेटवर अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर शो मेकर्सनी खुलासा करत म्हटलं होतं, की आत्ता पूर्ण सेट सॅनिटाईज करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सेटवरील सर्व लोकांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. आणि योग्य ती खबरदारी घेऊन शुटींग चालू करण्यात आलं आहे.

Published by: Aiman Desai
First published: April 22, 2021, 4:13 PM IST

ताज्या बातम्या