मुंबई 19 एप्रिल**:** शाहिद कपूरची (shahid Kapoor) पत्नी मिरा राजपूत (Mira Rajput) ही बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र तिची फॅन फॉलोइंग कुठल्याही नामांकित सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अन् ती देखील ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र यावेळी मिरा तिची मुलगी मिशामुळं चर्चेत आहे. तिच्या मुलीला फोटोग्राफिची प्रचंड आवड आहे. अन् तिनं काढलेले काही फोटो मिरानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. मिरानं हे फोटो शेअर करताना “मिशा खरंच या बाबतीत चांगली आहे. आणि त्यामुळे मला तिची आई म्हणून अभिमान वाटत आहे की ती तिचा छंद जोपासत आहे.” अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. मीराने स्वतःचा पांढऱ्या टॉप आणि त्याला मॅचिंग पँट घातलेला फोटो शेअर केला आहे. हा सुंदर फोटो मिशाने काढलेला आहे. मिशा केवळ पाच वर्षांची आहे. त्यामुळं तिनं केलेल्या या सुंदर फोटोग्राफीवर नेटकऱ्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अवश्य पाहा - ‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा
मीरा ही अभिनेता शाहिद कपूरची पत्नी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. ती सिनेसृष्टीत कार्यरत नाही. तरी देखील आपल्या स्टाईलिश अंदाजामुळं ती सोशल मीडियावर चर्चेत असते. फॉलोअर्सच्या बाबतीत ती कुठल्याही सुपरस्टार अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मीरा-शाहिदला दोन मुलं आहेत. यापैकी मिशा पाच वर्षांची आहे तर झैन चार वर्षांचा आहे. तो देखील आपल्या आईमुळं नेहमीच चर्चेत असतो.