मुंबई 19 एप्रिल**:** कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय देखील स्विकारला आहे. परंतु असं असताना देखील कोरोना रुग्णाच्या संख्येत कमतरता झालेली दिसत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी अभिनेत्री इशा देओल (Esha Deol) हिनं काही सोपे उपाय सुचवले आहेत. तिनं सांगितलेले उपाय जर केले तर कोरोना तुमच्या आसपासही फिरकणार नाही असा दावा तिनं केला आहे. (how can we prevent the spread of COVID-19) इशानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं स्वत:च्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. त्याचं वेळी तिनं कोरोनापासून वाचण्याचा एक सोपा उपाय सुचवला. ती म्हणाली, “घरातच राहा उगाचच घराबाहेर पडू नका. ड जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात घ्या. आणि निसर्गाच्या सानिध्यात राहा तुम्हाला कोरोना होणार नाही.” असा दावा इशानं केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अवश्य पाहा - ‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप
कोरोनानं घेतले 1 लाख 75 हजार 649 बळी देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल 1 लाख 75 हजार 649 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला गांभीर्याने पावलं उचलण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.