JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / '14 व्या वर्षी झाले होते लैंगिक शोषण'; डिप्रेशनबाबत बोलताना आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक खुलासा

'14 व्या वर्षी झाले होते लैंगिक शोषण'; डिप्रेशनबाबत बोलताना आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक खुलासा

यावेळी इराने आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबतही खुलासा केला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) इरा खान (Ira Khan) सध्या खूप चर्चेत आहे. इराने ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे (World Mental Health Day)’ च्यानिमित्ताने आपल्या डिप्रेशनबाबत एक पोस्ट शेअर केली होती. त्या व्हिडीओमध्ये इरा खान म्हणाली की, ‘मी डिप्रेस्ड आहे’, ज्यानंतर सोशल मीडियावर इरा खान खूप चर्चेत आली होती. पुन्हा एकदा इरा खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. नुकत्याच आलेल्या या व्हिडीओमध्ये इराने सांगितलं की, तिला कधीच कळालं नाही की ती नैराश्यत आहे. तिच्या पालकांचा घटस्फोट हे तिच्या नैराश्याचं कारण नसल्याचं तिने यावेळी सांगितलं. यावेळी तिने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचाही खुलासा केला. तिने सांगितले की, माझी घरातील परिस्थिती चांगली असल्याकारणाने मला कधी पैशांची कमकरता भासली नाही. माझे आई-वडील किंवा माझे मित्र यांनी कधीच माझ्यावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकला नाही. हे ही वाचा- अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले न्यूड PHOTOS; कारण वाचून कराल कौतुक पालकांच्या घटस्फोटावर खुलासा व्हिडीओमध्ये इराने आपल्या पालकांच्या घटस्फोटाविषयी सांगितलं की, जेव्हा मी लहान होते तेव्हाच माझ्या पालकांचा घटस्फोट झाला होता. मात्र त्याचा माझ्यावर कधीच वाईट परिणाम झाला नाही. कारण घटस्फोटानंतरही ते चांगले मित्र होते. विस्कळीत झालेलं कुटुंब कधीच नव्हतं. जेव्हा मी 6 वर्षांची झाले तेव्हा मला टीबी झाला. मात्र टीबीदेखील माझ्यासाठी इतकं त्रासदायक नव्हतं की त्यासाठी मी दु:खी व्हावे.

हे ही वाचा- आमिर खानच्या मुलीने शेअर केले भीतीदायक PHOTOS; पुन्हा सोशल मीडियावर जोरदार चर्चा 14 व्या वर्षात झालं लैंगिक शोषण जेव्हा मी 14 वर्षांची होते तेव्हा माझं लैंगिक शोषण झालं होतं. तेव्हा काय सुरू आहे याबद्दल मला माहीत नव्हतं, मात्र जेव्हा मला याबाबत माहिती झालं तेव्हा मी यापासून लांब गेले. मला खूप वाईट वाटलं की मी हे माझ्यासोबत का होऊ दिलं..मात्र हे देखील आयुष्यभराचा इतका मोठा आघात नव्हता की मी डिप्रेशनमध्ये जाईन. मी माझे मित्र-मैत्रिणी आई-बाबा यांनी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगू शकते. पण काय सांगू…? ते मला का विचारतील? माझ्यासोबत इतकही वाईट घडलेलं नाही की जितका मी विचार करतेय. इरा खान ही कायम विविध गंभीर विषयांवर आपलं मत व्यक्त करते. तिचा हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या