सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणं तशी साधारण बाब आहे. मात्र आजही जेव्हा सेलिब्रिटी न्यूड फोटो टाकतात तेव्हा खळबळ उडते. नुकतेच एका अमेरिकन गायिका, सॉंग रायटर, अभिनेत्री आणि लेखिता मारग्रेट लिएन राइम्स सिब्रायन (Margaret Lien Rhymes Sibrian) हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर काही न्यूड फोटो शेअर केले आहेत. मात्र या कारणासाठी मारग्रेट लिएन हिने हे फोटो शेअर केले आहेत, ते कारण ऐकून तुम्ही तिचं कौतुक कराल.
या पोस्टच्या माध्यमातून मारग्रेट लिएन त्वचेच्या आजारासंबंधित जागरुकता निर्माण करण्याचे काम करीत आहे.
मायग्रेनने फोटोंसह एक भावनिक कॅप्शन लिहिली आहे आणि याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ती सोरायसिस आजाराने पीडित आहे.
तिने जागतिक सोरायसिस दिवशी आपली ही स्टोरी शेअर केली आहे. मारग्रेनेने कॅप्शनमध्ये सांगितले की, हे फोटो शेअर करून आणि आपल्या आजाराविषयी सांगून ती खूप रिलॅक्स झाली आहे.
डॉक्टरांनुसार या त्वचेच्या आजारासाठी नेमका उपचार नाही, ज्यातून हे पूर्णपणे बरं होईल. मात्र याची लक्षणं पाहून उपचारातून काही मर्यादेपर्यंत नियंत्रणात ठेवू शकतो.