JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / खळबळजनक! संदीप नाहर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; सुसाइड नोट आणि शेवटचा VIDEO गायब

खळबळजनक! संदीप नाहर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; सुसाइड नोट आणि शेवटचा VIDEO गायब

कालच संदीप नाहरनं (sandeep nahar) सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली, त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याच्या राहत्या घरात त्याचा मृतदेह सापडला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 फेब्रुवारी : अभिनेता संदीप नाहरच्या (sandeep nahar) आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्याचा सोशल मीडियावरील (sandeep nahar facebook post)) सुसाइड नोट (Suicide note) आणि शेवटचा व्हिडीओ (video) गायब झाला आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाचा हा नवा ट्वीस्ट आला आहे. संदीप नाहरची ही शेवटची पोस्ट नेमकी कुणी डिलीट केली आणि का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. 15 फेब्रुवारी, 2021 ला  संदीप नाहरचा मृतदेह मुंबईतील गोरेगावमधील त्याच्या राहत्या घरात सापडला. बंद खोलीत पंख्याला गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. त्याआधी त्याने फेसबुकवर आपली सुसाईड नोट आणि व्हिडीओही पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्याने आत्महत्येचं कारण सांगितलं होतं. यामध्ये पत्नी कांचन शर्मामुळेच (kanchan sharma) त्याने असं टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट होतं. पण आता त्याची सोशल मीडियावरील ही शेवटची पोस्ट गायब झाली आहे. दरम्यान पोलिसांनी आपण ही पोस्ट डिलीट केली नसल्याचं म्हटलं आहे.  दैनिक भास्कर शी बोलताना मुंबई पोलिसांनी सांगितलं, हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पोलिसांनी सांगितलं नव्हतं किंवा त्यांनीदेखील ही पोस्ट डिलीट केली नाही. कदाचित फेसबुकनं आपल्या पॉलिसीअंतर्गत ही पोस्ट डिलीट केली असावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत तपास सुरू आहे. हे वाचा -  ब्युटी क्वीन करायची लहान मुलांचं अपहरण; सापळा रचून पोलिसांनी केली अटक शिवाय संशयाची सुई संदीपच्या पत्नीकडेही वळते आहे. कारण या नोटमध्ये तिचा उल्लेख होता. शिवाय संदीपची फक्त  ही शेवटची पोस्ट नाही तर 14 महिन्यांचा डेटाही हटवण्यात आला आहे. यामध्ये करवा चौथला पत्नीसाठी केलेली आणि गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूदिवशी केलेल्या पोस्टचा समावेश आहे. त्याच्या पेजवर आता शेवटची पोस्ट 17 डिसेंबर 2019 ची दिसते आहे. शेवटच्या पोस्टमध्ये संदीप काय म्हणाला होता? “आता जगण्याची इच्छा होत नाही आहे. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणं भीत्रेपणाचं लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचं होतं. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतलं नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटतं… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही…मुंबईत अनेक वर्षांपासून आहे…खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो. आत्महत्या मी खूप आधीच केली असती, पण मी स्वतःला वेळ दिला…सर्व ठिक होईल असं वाटलं…पण रोजच भांडणं होतात…या चक्रव्युहात अडकलोय..बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा रस्ता नाही…आता मला हे पाऊल आनंदाने उचलावं लागेल…इथल्या जीवनात नरक बघितला…इथून निघून गेल्यानंतर काय होईल माहिती नाही पण जे काही होईल मी त्याचा सामना करेल”. हे वाचा -  काय होती संदीपची शेवटची इच्छा?; अभिनेत्यानं का घेतला आत्महत्येचा निर्णय संदीपनं सुशांतसोबत एम एस धोनी द अनटोल्ड (M.S. Dhoni: The Untold Story) स्टोरी या फिल्ममध्ये काम केलं. यामध्ये त्याने धोनीच्या मित्राची छोटू भैय्याची भूमिका साकारली. याशिवाय केसरी, खानदानी शफाखाना आणि शुक्राणू या फिल्ममध्येही तो दिसला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या