मुंबई 1 जुलै: छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) जितका लोकप्रिय तितकाच वादग्रस्त ही ठरतो. या शोचे अनेक चाहते आहेत. पण अनेकदा निरनिराळ्या कारणांसाठी हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला पाहायला मिळतो. तर आता या शोच्या माझी परिक्षकानेच याची पोलखोल केली आहे. प्रसिद्ध गायक सलीम मर्चंट (Salim Merchant) ‘इंडियन आयडॉल 12’चा परीक्षक होता. पण त्याने या कार्यक्रमाविषयी काही खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत या रिॲलिटी शो (Reality Show) बद्दल त्याला काही प्रश्न विचारण्यात आले होते.
बॉलिवूडनं मंदिरा बेदीला दिला मानसिक आधार; या सेलिब्रिटींनी घरी जाऊन घेतली भेटसलीमला विचारण्यात आलं की, “या शोमध्ये स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी सांगीतल जातं का?” यावर सलीमने हो असं उत्तर दिलं. व त्यालाही असं करायला सांगितलं होत पण त्याने असं केलं नाही असंही तो म्हणाला. (Indian Idol controversy) पुढे सलीम म्हणाला की, “हो मलाही असचं करायला सांगीतल होतं पण खरं सांगायचं तर मी कधीही त्यांचं ऐकलं नाही. याचं कारणाने मी आज कोणत्याही शो चा जज (Judge) नाही.”
याशिवाय अनेकांनी आजवर या शो वर टीकाही केली आहे. किशोर कुमार (Kishor Kumar) यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचा मुलगा अमित कुमारला शो मध्ये बोलावण्यात आलं होतं. त्यांनाही स्पर्धकांचं कौतुक करायला सांगीतलं होत असा खुलासा त्यांनी केला होता.
HBD: VJ ते बॉलिवूड अभिनेत्री; असा होता रिया चक्रवर्तीचा अभिनय प्रवासयाशिवाय अनेकदा स्पर्धकांमध्ये ही भेदभाव केल्याची टीका प्रेक्षकांकडून कार्यक्रमावर केली जाते. व स्क्रिप्टेड शो (scripted show)असल्याची टीकाही सोशल मीडियावर केली जाते. त्यामुळे सलिमच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा या शो वर टीका होत आहे.