मुंबई 3 सप्टेंबर : दिग्गज अभिनेत्री सायरा बानू (Saira Bano) यांची प्रकृती मागील काही काळापासून खालावली आहे. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचे पती व दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावलेलीच आहे. तर आता त्या डिप्रेशन (Depression) आणि हार्ट प्रॉब्लेब्सनी (Heart problems) ग्रस्त आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल केलं होतं. 77 वर्षीय सायरा बानू हिंदूजा रुग्णालयात आयसीयुमध्ये आहेत. त्यांचं डावं व्हेन्ट्रीक्युलर खराब झालं असल्याचं डॉक्टरांनी पडताळणीनंतर सांगितलं आहे. तर गुरूवारी त्यांच्या केलेल्या ताज्या रिपोर्टनुसार त्यांना एक्यूट कोरोनरी सिंड्रोम नावाच्या आजाराचं निदान झालं आहे. डॉक्टरांनी त्यांना एन्जिओग्राफी (Angiography) करण्याचा सल्ला दिला आहे.
Bra आणि जॅकेट घालून एअरपोर्टवर पोहोचली अभिनेत्री; नेटिझन्स म्हणाले ही कसली फॅशन?त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांना एन्जिओग्राफी सरण्यास सांगितली आहे. मात्र सायरा यांनी ते करण्यास साफ नकार दिला आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी सांगितलं की, पतीच्या निधनानंतर त्या मानसिक ताणावातून जात आहेत. त्या रात्र रात्र झोपत नाहीत. तर दवाखान्यातून त्या सतत घरी जाण्याची इच्छा व्यक्त करतात. तर त्या अजूनही आयसीयुत आहेत.
सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर; पण मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्टसुत्रांच्या माहितीनुसार दिलीप कुमारांच्या निधनानंतर सायरा बानू फारच शांत शांत राहू लागल्या आहेत. त्यांना सतत पतीचा आठवण सतावते. तर कुटुंबातील इतर व्यक्तींशी देखील त्या सतत दिलीप कुमाराविषयी बोलतात. सायरा बानू आणि दिलीप कुमार हे तब्बल 54 वर्षे एकत्र होते. तेव्हापासून त्या सतत दिलीप कुमार यांच्यासोबत सावली सारख्या वावरत होत्या. ७ जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं.