• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर; पण मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट

सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर; पण मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट

प्रथमदर्शनी डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स समोर आले आहेत.

 • Share this:
  मुंबई 3 सप्टेंबर : प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अनेक आठवणी सध्या त्याचे चाहते शेअर करताना दिसत आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. आज मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार होणार आहेत. प्रथमदर्शनी डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स समोर आले आहेत. दरम्यान सिद्धार्थचा मृत्यू हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला होता. त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे (Post mortem report) सर्वांचच लक्ष लागलं होतं. सुरूवातीला डॉक्टर्सनी त्याला हार्ट अटॅक (Heart Attack) आला होता असं  म्हटलं होतं, मात्र रिपोर्टमध्ये अद्यापही मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यासाठी आणखी केमिकल अँनालिसिसची गरज असल्याचं सांगण्यात आलं आहे. केमिकल अनालिस्ट केल्यानंतरच  सिद्धार्थच्या शरिरात कोणतही विष तर नव्हतं ना याची माहिती समोर येईल. यासोबतच त्याला कोणताही आजार तर नव्हता, हे देखील स्पष्ट होईल.
  दरम्यान सिद्धार्थच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर डॉक्टर्सनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. हिस्टोपॅथोलॉजिकल स्टडी नंतरच मृत्यूचं कारम समोर येईल. त्यासाठी विसरा साठवून ठेवला आहे. सिद्धार्थच्या शरिरावर बाह्य भागावर किंवा आंतरिक भागात कोणतीही जखम आढळलेली नाही. त्यामुळे केमिकल चाचणीनंतरच मृत्युचं कारम समोर येणार आहे. त्यासाठी आता तयारी सुरू झाली आहे.
  Published by:News Digital
  First published: