JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रविना टंडननं Saina चित्रपटावर केलं ट्विट; ‘परिणीतीचा अभिनय पाहून...’

रविना टंडननं Saina चित्रपटावर केलं ट्विट; ‘परिणीतीचा अभिनय पाहून...’

या आगामी चित्रपटाची स्तुती खुद्द रविना टंडन (Raveena Tandon) करताना दिसत आहे. तिनं हा चित्रपट पाहाच अन्यथा खूप चांगली प्रेरणादायी गोष्ट तुम्ही मिस कराल असा सल्ला आपल्या चाहत्यांना दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 मार्च: बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकपटांचे (bollywood biopic) वारे वाहात आहेत. अनेक नामांकित सेलिब्रिटी, कलाकार, खेळाडू यांच्या आयुष्यावर चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. परंतु या सर्वांमध्ये ‘सायना’ (Saina) हा चित्रपट अधिक चर्चेत आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अन् आता या आगामी चित्रपटाची स्तुती खुद्द रविना टंडन (Raveena Tandon) करताना दिसत आहे. तिनं हा चित्रपट पाहाच अन्यथा खूप चांगली प्रेरणादायी गोष्ट तुम्ही मिस कराल असा सल्ला आपल्या चाहत्यांना दिला आहे. सायना हा चित्रपट प्रसिद्ध टेनिसपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) हिच्या आयुष्यावर आधारित आहे. नुकतंच या चित्रपटाचा एक खास शो बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आयोजित केला गेला होता. अन् हा शो पाहून अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. यामध्ये रविना टंडन सर्वात पुढे आहे. “नुकताच सायना हा चित्रपट पाहिला. खुपच सुंदर चित्रपट आहे. सायनाच्या बालपणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं देखील खूप सुंदर काम केलं आहे. परिणितीनं देखील या चित्रपटासाठी जीव तोडून मेहनत केली आहे. हा चित्रपट पाहून प्रेरणादायी अनुभव मिळेल.” अशा आशयाचं ट्विट करुन रविनानं चित्रपटाची स्तुती केली आहे.

संबंधित बातम्या

गेली चार वर्ष सायना हा चित्रपट चर्चेत होता. सुरुवातील अभिनेत्री दीपिका पदुकोण या चित्रपटात सायना नेहवालची भूमिका साकारणार होती. परंतु काही कारणांमुळं तिनं नंतर नकार दिला. पुढे श्रद्धा कपूरनं या चित्रपटासाठी होकार दिला. तिनं यासाठी तयारी देखील सुरु केली होती. परंतु मग तिनं देखील इतर चित्रपटांसाठी सायनामध्ये काम करण्यास नकार दिला. अखेर या चित्रपटासाठी परिणीती चोप्राची निवड करण्यात आली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यानं केलं आहे. सायना नेहवालचा ऑलंम्पिक पर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या