JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ratna Pathak Shah and Supriya Pathak together: बॉलिवूडच्या दोन कॉमेडी क्वीन बहिणी! टीव्हीवर गाजवला होता एक काळ आज करत आहेत या भूमिका

Ratna Pathak Shah and Supriya Pathak together: बॉलिवूडच्या दोन कॉमेडी क्वीन बहिणी! टीव्हीवर गाजवला होता एक काळ आज करत आहेत या भूमिका

बॉलिवूडमध्ये बहिणींचा duo कायमच यश मिळवत आला आहे. टीव्हीवर एक काळ गाजवणाऱ्या दोन सख्या बहिणी आणि यशस्वी अभिनेत्रींबद्दल बऱ्याचशा unseen गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 मे: बॉलिवूडमध्ये अनेक बहिणींच्या जोडी फारच लोकप्रिय आहेत. लोलो-बेबो, तनुजा-नूतनपासून अगदी अनेक बहिणी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला एक अत्यंत प्रसिद्ध बहिणींचा duo माहित आहे का,  ज्या एकेकाळी कॉमेडीमधल्या क्वीन्स म्हणून ओळखल्या जायच्या? या दोन बहिणी आहेत सुप्रिया पाठक (Supriya Pathak) आणि रत्ना पाठक**(Ratna Pathak Shah).** सुप्रसिद्ध अभिनेत्री दीना पाठक (Dina Pathak) यांच्या या दोन मुली आहेत. सुप्रिया आणि रत्ना पाठक यांच्या करिअरची सुरवात  सुप्रिया आणि रत्ना पाठक यांच्या करिअरची सुरवात 80 च्या दशकात झाली. सुप्रिया पाठक यांनी कलियुग या प्रसिद्ध चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर बाजार, मासूम, विजेता, मिर्च मसाला अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी अभिनय केला. रत्ना पाठक यांच्या करिअरची सुरवात श्याम बेनगल यांच्या ‘मंडी’ या चित्रपटापासून झाली. त्यांनी देखील मिर्च मसाला  या चित्रपटात अभिनय केला होता. वाचा-  शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बाहेरुन गायब झाली 25 लाखांची नवी नेमप्लेट, समोर आलं सत्य 10 वर्षे दोघी बहिणी अभिनयपासून लांब  सुप्रिया यांनी अभिनेता पंकज कपूर (Pankaj Kapur) यांच्याशी तर रत्ना पाठक यांनी प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर जवळपास 10 वर्षे दोघी बहिणी अभिनयपासून लांब होत्या. वाचा- उमेश कामतनं प्रेक्षकांना दिली ‘Bad News’, प्रकरणाचं आहे राजकीय कनेक्शन दोघीही तुफान कॉमेडी सिरियल्सचा भाग मधल्या काळात साधारण 2000 सालच्या सुरवातीच्या काळात दोघीही तुफान कॉमेडी सिरियल्सचा भाग होत्या,  ज्या भूमिकांमुळे त्यांना आज ओळखलं जातं. सुप्रिया पाठक यांनी खिचडी या सुप्रसिद्ध आणि धमाल मालिकेत साकारलेली हंसाबेन विसरणं कोणलाही शक्य होणार नाही. विचित्र लॉजिक लावणारी आणि इंग्लिशची पुरती वाट लावणारी वेंधळी हंसा आजही लोकांच्या लक्षात आहे. तर दुसरीकडे ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या सुपरहिट मालिकेत रत्ना पाठक शाह यांनी माया साराभाई हे पात्र साकारलं होतं. उच्चभ्रू घरात जन्मलेली, साऊथ बॉम्बेची हायक्लास माया आणि तिचे विनोदी टोमणे आजही जसेच्या तसे प्रेक्षकांना लक्षात आहेत. वाचा- 90 च्या दशकातील अप्सरा एकाच फ्रेममध्ये; करण जोहरच्या रॉयल पार्टीचे INSIDE PHOTO योगायोगाने साराभाई व्हर्सेस साराभाईच्या एका एपिसोडमध्ये खिचडी मालिकेची टीम पाहुणे कलाकार म्हणून आली होती. माया आणि हंसा या दूरच्या नातेवाईक असतात असं यात दाखवलं होतं. हंसाचा वेडेपणा आणि मायाची उडालेली धांदल पाहताना धमाल आली होती. हा एपिसोड अनेकांना आजही बघायला आवडतो.  हंसा-माया या duo चे असे सुपरहिट कोलॅब्रेशन पुन्हा व्हावे,  अशी त्यांची सुद्धा  इच्छा आहे. सुप्रिया आणि रत्ना यांनी इधर-उधर मालिकेत सुद्धा एकत्र काम केलं आहे. हा बहिणींचा duo भलताच प्रसिद्ध आहे. हे ही वाचा-  PHOTOS: प्राजक्ता माळीने ‘रानबाजार’ साठी वाढवलं होतं चक्क इतकं वजन रत्ना पाठक यांनी जाने तू या जाने ना, खूबसूरत चित्रपटात केलेली आईची भूमिका त्यानंतर गाजली. त्यांची लिपस्टिक अंडर माय बुरखा मधील प्रचंड वेगळी भूमिका बघून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. तर सुप्रिया यांनी सरकार, सरकार राज, रामलीला अशा चित्रपटात आपल्या अभिनयाची वेगवेगळी झलक दाखवली.

संबंधित बातम्या

रत्ना आणि सुप्रिया दोघीही ताकदीच्या अभिनेत्री आहेत. त्यांनी सोबत काम करावं आणि धमाकेदार प्रोजेक्ट करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. सुप्रिया पाठक नुकत्याच मिमी आणि रश्मी रॉकेट चित्रपटात दिसल्या होत्या. रत्ना पाठक शाह या नव्या रोड ट्रिप मूवी मध्ये तापसी पन्नूसोबत दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या