करण जोहरने नुकतंच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्याने एका रॉयल पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यानिमित्ताने 90 च्या दशकातील सुपरस्टारनां पुन्हा एकदा एकत्र पाहण्याचा योग आला.
या पार्टीत राणी मुखर्जी, माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा आणि ऐश्वर्या रॉय यांना अनेक वर्षांनंतर एका फ्रेममध्ये पाहण्यात आलं.
तसेच किंग खान शाहरुख, बॉलिवूड भाईजान सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांनासुद्धा एकत्र फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
तसेच ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर, तब्बू आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीसुद्धा सुंदर फोटो शेअर केला आहे.