मुंबई, 28 मे- बॉलिवूड
(Bollywood) अभिनेता शाहरुख खानला
(Shahrukh Khan) किंग खान असं म्हटलं जातं. फक्त देशातच नव्हे तर जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. शिवाय त्याच्या खाजगी आयुष्यामध्येसुद्धा या चाहत्यांना फारच रस असतो. या अभिनेत्याबद्दल लहान-लहान गोष्टी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. 23 एप्रिलला अभिनेत्याच्या 'मन्नत'
(Mannat) या लोकप्रिय बंगल्यावर नवीन नेमप्लेट लागल्याचं समोर आलं होतं. मात्र एका महिन्यातच ही नवी नेमप्लेट हटविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पाहूया नेमकं काय घडलंय.
शाहरुख खानचा 'मन्नत' हा बंगला फारच प्रसिद्ध आहे. या बंगल्यासमोर अनेक लोक येऊन फोटो काढण्याचा आनंद घेत असतात. काही आठवड्यांपूर्वी हा बंगला खूप चर्चेत आला होता. या चर्चेचे कारण होतं, त्यांच्या घराची नवीन नेमप्लेट. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर शाहरुखच्या घरातील नवीन प्लेट्सचे अनेक फोटोही शेअर केले होते. नेमप्लेटची किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र, आता शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर ही नवी नेमप्लेट हटविल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यामागचं कारण आता समोर आलं आहे.

शाहरुख खानच्या एका जवळच्या सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला माहिती देत सांगितलंय की, “त्या 25 लाखांच्या नव्या नेमप्लेटमधून एक हिरा निघून पडला आहे. आणि त्यामुळे ती नेमप्लेट दुरुस्तीसाठी काढण्यात आली आहे. ही नेमप्लेट घराच्या बागेत ठेवण्यात आली असून ती दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मन्नतच्या बाहेर लावली जाणार आहे. ही नेमप्लेट शाहरुखची इंटिरियर डिझायनर पत्नी गौरीने डिझाइन केली आहे.
(हे वाचा:ठरलं! पायल रोहतगी-संग्राम सिंह लवकरच बांधणार लग्नगाठ, यादिवशी करणार डेस्टिनेशन वेडिंग )
शाहरुख खानचा हा बंगला नेहमीच चर्चेत असतो. अनेक लोक मन्नतसमोर जाऊन फोटो काढण्याचं स्वप्न पाहतात. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला शाहरुख मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना अभिवादन करतो. यावेळी हजारो चाहते उपस्थित असतात.कामाबाबत सांगायचं झालं तर, अभिनेत्याने नुकतंच चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्यासोबत आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'डंकी' (Dunky) असं या चित्रपटाचं नाव आहे. यासोबतच तो दीपिका [पादुकोणसोबत 'पठाण' आणि साऊथ अभिनेत्री नयनतारासोबतही एका चित्रपटात दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.