मुंबई, 28 मे- अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सध्या त्याच्या ‘दादा एक गुड न्यूज’ आहे या नाटकाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक शहरात या नाटकाचे तुफान प्रयोग आहेत. पण आता उमेशनं एक बॅडन्यूज शेअर केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यानं याबद्दल माहिती दिली आहे. शिवाय त्याच्या या पोस्टमध्ये एका राजकीय पक्षाचा उल्लेख आहे. त्यामुळं ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेता उमेश कामतनं त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. उमेशने आपल्या पोस्टमध्ये, ‘एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे ५ जूनचा चिंचवड येथील ‘दादा एक गुड न्यूज आहे’ ( marathi drama dada ek good news aahe ) या नाटकाचा प्रयोग रद्द. प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती शेअर केली आहे. उमेशसोब अभिनेत्री ह्रता दुर्गुळेनं देखील तिच्या इन्स्टा स्टोरीवर हीच पोस्ट शेअर केली आहे. वाचा- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेतील रणदीप हुड्डाचा First Look रिलीज ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाच्या प्रयोगासाठी काही दिवसापूर्वी या नाटकातील कलाकारांनी दुबई गाठली होती. आबूधाबी याठिकाणी या नाटकाटे नुकतेच प्रयोग झाले आहेत. त्यांच्या दुबई ट्रीपचे काही फोटो देखील या नाटकातील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. महाराष्ट्रातच नाही तर परदेशात देखील या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र सध्या एका राजकीय पक्षामुळं या नाटकाचा आजचा प्रयोग रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाने आजच्या काळातली बंडखोर मुलगी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.नाटकाच्या नावातच ही बहीण-भावाची गोष्ट असणार याचं सूचन आहे. हे बहीण-भाऊ आहेत आजच्या काळातले. त्यांच्या समोरचे पेच आजचे आहेत. यात उमेश कामत आणि ह्रता दुर्गुळे यांची मुख्य भूमिका आहे.