JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आजीबाईंचा ‘टॉप टकर’ डान्स पाहिला का?; VIDEO पाहून बादशाह देखील झाला थक्क

आजीबाईंचा ‘टॉप टकर’ डान्स पाहिला का?; VIDEO पाहून बादशाह देखील झाला थक्क

एक वृद्ध महिला आपल्या नातवासोबत बादशाहच्या रॅप सॉन्गवर थिरकताना दिसत आहे. हा गंमतीशीर व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 फेब्रुवारी: ‘बादशाह’ हा बॉलिवूडमधील सध्याचा आघाडिचा गायक म्हणून ओळखला जातो. अलिकडेच त्याचं ‘टॉप टकर’ हे गाणं रसिकांच्या भेटीस आलं आहे. या रॅप सॉन्गवर (अमित उचाना), (जोनिता गांधी), (युवान शंकर राजा), (रश्मिका मंदाना) यांसारखे अनेक सेलिब्रिटी झळकले आहेत. या कलाकारांचे व्हिडीओ चर्चेत असतानाच आता आणखी एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एक वृद्ध महिला आपल्या नातवासोबत बादशाहच्या रॅप सॉन्गवर थिरकताना दिसत आहे. हा गंमतीशीर व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

संबंधित बातम्या

अवश्य पाहा - कधी मिळणार कोरोना लस? सोनम कपूरच्या प्रश्नाचं तुमच्याकडे आहे का उत्तर? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आजीबाई आपल्या नातवासोबत डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी साधासुधा नाही तर चक्क हिपहॉप डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून बादशाह देखील चकित झाला. व त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडीओ शेअर करत या आजीबाईंची प्रचंड स्तुती केली आहे. काही तासांत 81 हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून त्याला लाईक केलं आहे. अगदी लाईक करण्यांमध्ये आयुषमान खुराना हा अभिनेता देखील आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या