मुंबई 25 फेब्रुवारी: कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. देशभरातील हजारो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली. शिवाय या विषाणूला पूर्णपणे रोखणारी लस अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसोबत आता सेलिब्रिटी देखील त्रस्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोमन कपूर हिनं भारतात कोरोनाची लस आली का? असा सवाल देशवासीयांना केला. मात्र हा प्रश्न विचारणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. उत्तर देण्याऐवजी नेटकऱ्यांनी उलट तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. “माझ्या आई-वडिलांना आणि आजी-आजोबांना भारतात कोरोनाची लस मिळू शकेल का? आणि ही लस कधी आणि कुठे मिळू शकेल? या बाबत कोणाला काही माहिती आहे का?” असा सवाल तिने देशवासीयांना केला होता. मात्र तिच्या या प्रश्नवरुन तिला सध्या ट्रोल केलं जातं आहे. “तू वृत्तवाहिन्या पाहात नाही का? प्रत्येक वर्तमानपत्रात, टीव्हीवर, वेबसाईट्सवर कोरोनाबाबत माहिती दिली जात आहे. कधी तरी स्वत:चं डोकं चालव” अशा आशयाचे ट्विट करत ट्रोलर्सनं सोनम कपूरची खिल्ली उडवली आहे.
Can anyone tell me.. I’m getting different information from everyone. pic.twitter.com/GnqXcFOfHX
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) February 24, 2021
LOL you don't have Google in phone?
— Pranjul (@SharmaaJie) February 24, 2021
अवश्य पाहा - ‘डोक्यावर पुस्तकं अन् हातात बादली’; त्या रॅगिंगमुळं अभिनेत्री झाली सुपरमॉडेल कोरोनाविरोधात आणखी एक लस भारतात सध्या दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान जगात सर्वात पहिली कोरोना लस लाँच करणाऱ्या रशियानं आता आपल्या तिसऱ्या लशीलाही मंजुरी दिली आहे. रशियाच्या स्पुतनिक V, एपिवॅकनंतर आता तिसरी लस आहे ती कोविवॅक. चुमाकोव्ह सेंटरनं तयार केलेली ही लस आहे. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल मार्चमध्ये सुरू होणार आहे. मार्चमध्येच या लशीचा लसीकरण मोहीमेत समावेश केला जाणार आहे. तीन लशीचा वापर करणारा रशिया हा जगातील पहिला देश असेल, असं रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्टिन यांनी ही घोषणा केली आहे.