मुंबई 29 मार्च**:** बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यामुळं अनेकदा तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ देखील आली आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. राखीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती बिग बॉसनं (Big Boss) तिला लाखो रुपयांची कार भेट म्हणून दिली असा दावा करताना दिसत आहे. (car as a gift) ‘इन्स्टा बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजनं राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका कारच्या शोरुममध्ये गेल्याचं दिसतंय. या शोरुमध्ये ती एका निळ्या रंगाच्या कार शेजारी उभी राहून, ही कार मला बिग बॉसनं भेट दिली असा दावा करताना दिसत आहे. शिवाय तिच्या शेजारी उभे असलेले लोकही तिच्या दाव्याला हो असं म्हणून होकार देताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या कारची किंमत तब्बल 25 लाख रुपये आहे. बिग बॉसच्या फायनल राउंडमधून बाहेर पडताना राखीला केवळ 14 लाख रुपये मिळाले होते. या पार्श्वभूमीवर राखीला खरंच बिग बॉसनं 25 लाखांची कार भेट दिली का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. अवश्य पाहा - चित्रपटात ऐश्वर्याला किस का करत नाही? अभिषेक बच्चन म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये…’
राखीनं बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. तिनं चॅलेंजर म्हणून म्हणून वाईल्ड कार्ड एण्ट्री मारली होती. तिच्या सोबत आलेले सर्व स्पर्धक एलिमिमेट झाले. परंतु राखीनं टॉप 5 पर्यंत धडक मारली होती. त्यानंतर मात्र तिनं 14 लाख रुपये घेऊन शो सोडण्याचा निर्णय घेतला. मिळालेले पैसे राखीनं आपल्या कर्करोगग्रस्त आईच्या उपचारासाठी वापरले होते. शिवाय राखीला सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खानने यांनी देखील आर्थिक मदत केली होती.