मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /चित्रपटात ऐश्वर्याला किस का करत नाही? अभिषेक बच्चन म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये...’

चित्रपटात ऐश्वर्याला किस का करत नाही? अभिषेक बच्चन म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये...’

आजवर आपल्या पत्नीला चित्रपटांमध्ये किस का केलं नाही? (Aishwarya Rai Bachchan) असा सवाल त्याला वारंवार केला जातो. अखेर या प्रश्नाचं उत्तर त्यानं आपल्या चाहत्यांना दिलं.

आजवर आपल्या पत्नीला चित्रपटांमध्ये किस का केलं नाही? (Aishwarya Rai Bachchan) असा सवाल त्याला वारंवार केला जातो. अखेर या प्रश्नाचं उत्तर त्यानं आपल्या चाहत्यांना दिलं.

आजवर आपल्या पत्नीला चित्रपटांमध्ये किस का केलं नाही? (Aishwarya Rai Bachchan) असा सवाल त्याला वारंवार केला जातो. अखेर या प्रश्नाचं उत्तर त्यानं आपल्या चाहत्यांना दिलं.

मुंबई 29 मार्च: अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानं आजवर रोमँटिक, अक्शन, विनोदी अशा जवळपास सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अर्थात आजवर त्याला सुपरस्टार अभिनेत्याचा टॅग मिळाला नसला तरी देखील काही समिक्षकांच्या मते तो एक अष्टपैलू अभिनेता आहे. मात्र असं असताना देखील त्यानं आजवर आपल्या पत्नीला चित्रपटांमध्ये किस का केलं नाही? (Aishwarya Rai Bachchan) असा सवाल त्याला वारंवार केला जातो. अखेर या प्रश्नाचं उत्तर त्यानं आपल्या चाहत्यांना दिलं.

प्रसिद्ध समिक्षक ओपरा विनफ्रे (Oprah Winfrey) यांनी घेतलेल्या सेलिब्रिटींच्या मुलाखती कायमच चर्चेत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी दोघांना विविध प्रकारचे सवाल केले. परंतु किसिंगबाबत केलेल्या प्रश्नामुळं दोघंही अवाक् झाले. ऐश्वर्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं चित्रपटांमध्ये अनेकदा किसिंग सीन केले आहेत. परंतु अभिषेकसोबत तिनं एकदाही किसिंग सीन का केला नाही? असा सवाल तिनं केला होता. या प्रश्नावर अभिषेकनं उत्तर दिलं.

अवश्य पाहा - प्रभासनं वडिलांची इच्छा केली पूर्ण; अखेर खरेदी केली इतक्या कोटींची कार

तो म्हणला, “किसिंग सीन असलेला चित्रपट आजवर आम्हाला मिळालेला नाही. पाश्चिमात्य संस्कृतीत किस करणं हे खूप सामान्य आहे. पण भारतात याकडे लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये रोमान्सचा अर्थ गाणी असा असतो. कलाकार विविध लोकेशनवर जातात आणि नाचून आपलं प्रेम व्यक्त करतात. शिवाय चित्रपटात एखादा किसिंग सीन असेल तर त्याला अडल्ट सीनेमाचा टॅगही लावला जातो. कुटुंबासोबत हा चित्रपट पाहता येईल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. त्यामुळं आम्ही किसिंग सीन टाळून संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल अशाच चित्रपटांमध्ये काम करतो.” अलिकडेच ओपरा विनफ्रे यांनी प्रियांका चोप्राची देखील मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत प्रियांकानं दिलेल्या उत्तरामुळं तिला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.

First published:

Tags: Abhishek Bachchan