JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / एका ट्विटनं माजवली खळबळ; मोदींना ‘गो बॅक’ म्हणणारी ओविया आहे तरी कोण?

एका ट्विटनं माजवली खळबळ; मोदींना ‘गो बॅक’ म्हणणारी ओविया आहे तरी कोण?

तमिळनाडू भाजपाचे राज्य सचिव डी अ‍ॅलेक्सिस सुधाकर (D Alexis Sudhakar) यांनी ओवियाविरूद्ध पोलीस अधीक्षक आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु एका ट्विटनं खळबळ माजवणारी ही ओविया आहे तरी कोण?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई**,** 17 फेब्रुवारी: शेतकरी आंदोलनामुळं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असंतोष वाढत चालला आहे. अनेक नामांकित सेलिब्रिटी त्यांच्या ध्येयधोरणांवर टीका करताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रयत्न दाक्षिणात्य अभिनेत्री ओविया हेलन (Oviyaa Helen) हिने देखील केला होता. तिनं ‘गो बॅक मोदी’ असं ट्विट करुन मोदींबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु हे ट्विट करणं आता तिला भारी पडू शकतं. तमिळनाडू भाजपाचे राज्य सचिव डी अ‍ॅलेक्सिस सुधाकर (D Alexis Sudhakar) यांनी ओवियाविरूद्ध पोलीस अधीक्षक आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु एका ट्विटनं खळबळ माजवणारी ही ओविया आहे तरी कोण? ओविया ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचं पूर्ण नाव हेलेन नेल्सन असं आहे. तिनं 2007 साली ‘कांगारू’ या मल्याळम चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘अपुर्वा’, ‘नालाय नमधे’, ‘कालवनी’, ‘मरिना’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यान ओवियाला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘मुथुकु मुथागा’ या चित्रपटामुळं. 2011 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटानंतर तिचं नाव दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडिच्या कलाकारांमध्ये घेतलं जाऊ लागलं. अभिनयासोबतच ओविया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. नुकतेच तिने नरेंद्र मोदींविरोधात ट्विट करुन खळबळ माजवली होती.

संबंधित बातम्या

अवश्य पाहा -  नक्षलवाद सोडून अभिनेता झाला, आता मोहन भागवतांना भेटून पुन्हा राजकारणात? ओविया हेलेन यांच्या ट्वीटमागील हेतूचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणीही भाजप नेत्याने केली आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंड्याखाली जनतेला भडकवण्यासाठी अभिनेत्रीने हे ट्वीट केल्याचा भाजपला संशय आहे. हेलेनच्या या ट्वीटनंतर बर्‍याच लोकांनी सार्वजानिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावाही सुधाकरन यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या