JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मिथिला पालकरनं केला मार्गारेका डान्स; Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

मिथिला पालकरनं केला मार्गारेका डान्स; Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

मिथिलानं केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रसिद्ध स्पॅनिश गाणं मार्कारेनावर डान्स करताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 मार्च: कप साँगमुळं प्रकाशझोतात आलेली मिथिला पालकर (Mithila Palkar) ही सध्या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मिथिला अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच नेहमीच चर्चेत असतात. (Mithila Palkar Macarena Dance) सध्या मिथिलानं केलेल्या एका डान्सचा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रसिद्ध स्पॅनिश गाणं मार्कारेनावर डान्स करताना दिसत आहे. लॉकडाउनमुळं वैतागलेली मिथिला सुट्टया घालवण्यासाठी आपल्या कुटुंबीय आणि मित्र मैत्रीणींसोबत अलिबाग येथे गेली आहे. या पिकनिकचे फोटो देखील ती इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसत आहे. “शहारपासून खूप दूर दूर मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा उत्तम मार्ग” असं म्हणत तिनं आपल्या या पिकनिकची सुरुवात केली होती. दरम्यान तिनं एक व्हिडीओ डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अवश्य पाहा - सलमानची पहिली मराठमोळी नायिका पन्नाशीत, फिटनेसच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर

संबंधित बातम्या

मिथिलानं अलिबागमध्ये सध्या राहत असलेल्या हॉटेलमध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. यात ती प्रसिद्ध स्पॅनिश गाणं मार्कारेनावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणं जगप्रसिद्ध पॉपस्टार लॉस डेल रिव्ह्यू यांनी 1993 साली तयार केलं होतं. युरोप खंडात आनंद व्यक्त करण्यासाठी हे गाणं गायलं जातं. या गाण्याप्रमाणेच मिथिला खूप धमाल करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पांढऱ्या ड्रेसमध्ये ती हॉटेलच्या लॉनमध्ये उभी राहुन ठुमके देताना दिसतेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या