भाग्यश्री ही महाराष्ट्रीय आहे. तिचं आडनाव पटवर्धन. तिचा जन्म 1969 मध्ये सांगली जिल्ह्यातल्या मिरजेत झाला. ती सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांच्या कुटुंबातील आहे. आता बरखास्त झालेल्या सांगली संस्थानचे राजे श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन हे तिचे वडील आहेत.