मुंबई, 7 एप्रिल : सध्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांना (film stars) कोरोनाचा (corona) विळखा घट्ट होताना दिसत आहे. दररोज एखाद्या तरी कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडी (famous couple) आणि कलाकार प्रिया बापट (priya bapat) आणि उमेश कामत (umesh kamat) यांना कोरोनाची लागण झाली होती. यावर त्यांनी यशस्वी मात केली आहे. आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. नुकताच प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडीओ (Video)पोस्ट केला आहे. त्यात तिनं ’go corona go’ असं कॅप्शन देत एक गाणं देखील म्हटलं आहे. चला पाहूया काय आहे हा नेमका व्हिडीओ.
सध्या सर्वत्र कोरोनाचा विळखा घट्ट होतं चालला आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही कलाकार कोरोनाच्या विळख्यातून यशस्वी लढा देत बाहेर पडले आहेत. प्रिया बापट आणि उमेश कामत यांना कोरोनाची लागण झाली होती. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. या दोघांनी स्वतःला घरीचं क्वारंटाईन करून घेतलं होतं. आणि योग्य ते औषधोपचार सुद्धा सुरु होते. चाहत्यांचा प्रार्थनेमुळे हे दोघेही काही दिवसातचं कोरोना मुक्त झाले होते. या जोडप्याने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून लाईव येत आपण कोरोनामुक्त झाल्याची आणि लवकरच चित्रिकरणावर परत येत असल्याची माहिती दिली होती. (हे वाचा: भारतातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम ‘संजीवनी’ मध्ये सोनू सूद होणार सहभागी ) आज प्रियानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. तसंच तिनं या व्हिडीओखाली ‘go corona go, #fightback असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टद्वारे प्रिया सर्वांना करोना परिस्थिती सोबत लढण्याचं बळ सर्वांना मिळूदे ही प्रार्थना करत आहे. आणि कोरोनाला पळवून लावण्यासाठी आपल्याला धैर्य मिळूदे असं सुद्धा म्हणत आहे.