मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम 'संजीवनी' मध्ये सोनू सूद होणार सहभागी, बुधवारी होणार मोहिमेचा शुभारंभ

भारतातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम 'संजीवनी' मध्ये सोनू सूद होणार सहभागी, बुधवारी होणार मोहिमेचा शुभारंभ

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत Network 18 ग्रुपच्या 'संजीवनी' या लसीकरण मोहिमेसोबत अभिनेता सोनू सूद जोडला गेला आहे. बुधवार - 7 एप्रिलला मोहिमेचा आरंभ होत आहे.

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत Network 18 ग्रुपच्या 'संजीवनी' या लसीकरण मोहिमेसोबत अभिनेता सोनू सूद जोडला गेला आहे. बुधवार - 7 एप्रिलला मोहिमेचा आरंभ होत आहे.

कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत Network 18 ग्रुपच्या 'संजीवनी' या लसीकरण मोहिमेसोबत अभिनेता सोनू सूद जोडला गेला आहे. बुधवार - 7 एप्रिलला मोहिमेचा आरंभ होत आहे.

मुंबई, 6 एप्रिल : महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांत कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुद्धा सुरू आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत Network 18 ग्रुपच्या भारतातील सर्वात मोठ्या 'संजीवनी' (Sanjeevani) लसीकरण मोहिमेत अभिनेता सोनू सूद सहभागी झाला आहे. या संदर्भात अभिनेता सोनू सूद याने इंस्टाग्राम पोस्ट करुन माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य दिवस (World Health Day)म्हणजेच 7 एप्रिल रोजी अभिनेता सोनू सूद या मोहिमेत सहभागी होणार असून अटारी बॉर्डर येथून याची सुरुवात होणार आहे. अभिनेता सोनू सूद याने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "कोविड 19 विरुद्धच्या लढाईत नेटवर्क 18 ग्रुपच्या भारतातील सर्वात मोठ्या संजीवनी या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचा अभिमान आहे."

काय आहे संजीवनी मोहीम?

नेटवर्क 18 ग्रुपच्या मोहिमेला 'संजीवनी - अ शॉट ऑफ लाइफ' (Sanjeevani - A Shot of Life) असं नाव देण्यात आलं आहे. फेडरल बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाच्या अंतर्गत या मोहिमेला सहाय्य करण्यात येणार आहे. यासोबतच अपोलो 24/7 अंतर्गत देशातील सर्वात जास्त दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत लसी करणाच्या संबंधित काम करण्यात येणार आहेत.

मोहिमेचा एक भाग म्हणून फेडरल बँक ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभावित असलेल्या पाच जिल्ह्यांतील खेड्यांमध्ये मोफत लसीकरण करेल. देशातील अब्जावधी लोकसंख्येचं लसीकरण करण्याचे काम फक्त सरकारनेच करण्याची गरज नाही. त्याऐवजी नेटवर्क 18 सारख्या जबाबदार खाजगी कंपन्या पुढाकार घेऊन लसीकरण मोहिमेत सहभागी होत आहेत. यामुळे नागरिकांचे नुकसान कमी होण्यास आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत होईल.

अपोलो 24/7 ने निवडलेल्या पाच जिल्ह्यांमधील सर्व लसीकरण शिबिरांचे मैदानात आयोजन करण्यात येणार आहे. रुग्णालयातील साखळी, तज्ञ डॉक्टर आणि लसीकरण तज्ञांसह, नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यास आणि अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यास मदत करेल. या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडेर म्हणून अभिनेता सोनू सूद याने स्वत:ला ही लस घेण्यापूर्वी संजीवनी मोहीम राबवत इतरांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.

हे पण वाचा: स्वप्नांना लागली कोरोनाची नजर! पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभवचा Covid ने घेतला बळी

संजीवनी मोहिमेचा उद्देश आणि रणनीती

या मोहिमेची पहिलं उद्दीष्ट म्हणजे सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लसीला रोखणे. भारतीयांना लस ताबडतोब घेण्याची आवश्यकता आणि त्याच बरोबर समाजातील खालच्या वर्गाला ज्यांना लस घेण्याची इच्छा नाहीये. त्यांना लसीकरणासाठी आवश्यक माहिती देणे आणि लसीकरण करणे हे उद्दीष्ट आहे.

हे पण वाचा: रेमडिसिवीर इंजेक्शनच्या किमतींमध्ये एवढी तफावत का? News18Lokmat च्या बातमीनंतर सरकारचं Covid औषधाबद्दल आश्वासन

संजीवनी गाडी

भारतातील लसीकरण मोहिमेबद्दल जनजागृती करणे आणि लोक त्यांच्या विरोधात ज्या गोष्टी बोलत आहेत असे गैरसमजू दूर करणे हे सुद्धा एक महत्वाचे उद्दीष्ट आहे. संजीवनी मोहिमेद्वारे लसीकरणाची योग्य माहिती मिळाल्यावर नागरिक लस घेण्यास स्वत:हून पुढे येतील. ही उद्दीष्टे लक्षात घेऊन अमृतसरमधील कार्यक्रमात 'संजीवनी गाडी' (Sanjeevani Gaadi)ला सुद्धा हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. हे वाहन कोविड लसीच्या संदर्भात जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी फेडरल बँकेने निवडलेल्या पाच जिल्ह्यातील सुमारे 1500 गावांना भेट देईल.

लस गिफ्ट देण्याची कल्पना (Gift a vaccine)

संजीवनी मोहिमेची कल्पनाही 'लस गिफ्ट' देण्याची आहे ज्यामध्ये पार्टनर असलेल्या कंपन्या दत्तक घेतलेल्या गावांमध्ये नागरिकांना मोफत लसीकरणासाठी अर्थसहाय्य करतील. दत्तक घेण्यासाठी निवडलेल्या जिल्ह्यांत अमृतसर, नाशिक, इंदूर, गुंटूर, दक्षिण कन्नड यांचा समावेश आहे. हे जिल्हे देशातील सर्वाधिक कोविड बळी असलेल्या जिल्ह्यांपैकी आहेत.

First published:

Tags: Corona vaccination, Sonu Sood