मुंबई 15 मार्च: ‘जुळून येती रेशीम गाठी’ (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिनं चाहत्यांना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. (childhood dancing video) प्राजक्तानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ‘देवदास’ या चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावर ती नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या बालपणीचा आहे. व्हिडीओ धुरकट दिसत असला तरी प्राजक्ताच्या आठवणी मात्र ताज्या आहेत. प्राजक्ताला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. “जेव्हा मी काडीपैलवान होते आणि बघून हुबेबुब नाचायचा प्रयत्न करायचे.”, असं गंमतीशीर कॅप्शन लिहून तिनं आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. अवश्य पाहा - स्ट्रिप डान्स करताना उर्वशीसोबत नको ते घडलं; हनी सिंगनं सावरला प्रसंग
प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘जुळून येती रेशिम गाठी’, ‘नकटिच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमध्ये काम केलं. ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या ‘मेघा देसाई’ या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला ‘खो-खो’, ‘संघर्ष’, ‘हंपी’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे.