मुंबई 15 मार्च: उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. उर्वशी ही आपल्या अभिनयापेक्षा डान्स आणि मादक अदांमुळं अधिक चर्चेत असते. हनी सिंगच्या (Yo Yo Honey Singh) लव्ह डोज (Love Dose) या रॅप सॉगमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. या गाण्याचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिनं एक व्हिडीओ शेअर करुन या आगामी गाण्याची घोषणा केली. मात्र हा व्हिडीओ गाण्यापेक्षा उर्वशीच्या वार्डरॉब मॉलफंक्शनमुळं (wardrobe malfunction) अधिक चर्चेत आहे. उर्वशीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती हनी सिंगसोबत लव्ह डोज या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा डान्स करत असताना उर्वशीचे कपडे घसरु लागले. मात्र हा प्रकार तिच्यासोबत नाचणाऱ्या हनी सिंगनं सावरला. त्यानं जोरजोरात डान्स करुन प्रेक्षकांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं. तेवढ्यात उर्वशीनं स्वत:चे कपडे सावरुन ती पुन्हा डान्स करु लागली. लक्षवेधी बाब म्हणजे हा व्हिडीओ स्वत: उर्वशीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिनं आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. अवश्य पाहा - अमेरिकन सोहळ्यात ‘भारतीय शेतकऱ्यांची’ चर्चा; ग्रॅमी पुरस्कारात नवं आंदोलन
उर्वशीसोबत हा प्रसंग पहिल्यांदा घडलेला नाही. ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान देखील तिच्यासोबत वार्डरॉब मॉलफंक्शन झालं होतं. त्यावेळी तिच्यासोबत डान्स करणाऱ्या विवेक ओबेरॉयने हा प्रसंग सावरला होता. त्या व्हिडीओची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळाली होती.