JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / माझ्या नाटकाचे प्रेक्षक वडिलांच्या टॅक्सीतून आले होते तेव्हा...' भरत जाधवने शेअर केली इमोशनल FB पोस्ट

माझ्या नाटकाचे प्रेक्षक वडिलांच्या टॅक्सीतून आले होते तेव्हा...' भरत जाधवने शेअर केली इमोशनल FB पोस्ट

‘तुमच्यासारखा देवमाणूस मी आयुष्यात पाहिला नाही’ हे भरज जाधव यांच्या नाटकातलं नाही तर खरंखुरं भावुक होऊन लिहिलेलं वाक्य आहे. वडील जेव्हा टॅक्सी चालवायचे ते खडतर दिवस आणि त्यानंतरच्या भावनांना त्यांनी वाट करून दिली आहे..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जानेवारी : अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) याला मराठीतला सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. चित्रपटाचा पडदा आणि नाटकाचा रंगमंच दोन्ही ठिकाणी तो त्याच ताज्या दमानं आणि ताकदीचं काम करतो. साहजिकच चाहत्यांचं (fans) प्रचंड प्रेम त्याच्या वाट्याला येत असतं. नुकताच त्यानं फेसबुकवर (Facebook) एक नाट्यमय अनुभव शेअर केला आहे. भरतचे वडील टॅक्सीचालक (Taxi-driver) होते. सामान्य कुटुंबातून येत त्यानं हे झळाळतं यश मिळवलं आहे. त्यानं या फेसबुक पोस्टमध्ये त्या काळातला एक काळजाचा ठाव घेणारा अनुभव लिहिला आहे, ‘एकदा आमच्या वडिलांच्या (father) टॅक्सीमध्ये काही प्रवासी बसले होते. त्यां लोकांना नाटकाच्या प्रयोगाला जाण्यासाठी उशीर होत होता. हे सगळे वडिलांशी हुज्जत घालू लागले. त्यांनी वडिलांना अक्षरश: आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. मात्र वडील अवाक्षरही बोलले नाहीत. घरी आल्यावर हा अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला.’ हे सगळे लोक भरतच्याच ऑल द बेस्ट या नाटकाचा प्रयोग (drama show) पाहायला चालले होते!

एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते… त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासा दरम्यान… Posted by Bharat Jadhav on  Wednesday, January 20, 2021

भरत पुढे पोस्टमध्ये (post) सांगतो, की हे सगळे प्रवासी त्याच्याच नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी चाललेले होते. मुलाच्या नाटकासाठी लोक अशी इतकी गर्दी करत आहेत या गोष्टीसाठी त्याच्या वडिलांनी तो अपमान मूकपणे सहन केला हे भरतनं अतिशय भावनिक होत या पोस्टमध्ये लिहिलं आहे. भरत सांगतो, की मी त्या दिवशी खूप रडलो. तेव्हा मला 100 रुपये नाईट (night) मिळायची. मी त्यांना त्यादिवशी म्हणालो की आता गाडी चालवणं बंद करा. त्यांनी टॅक्सी चालवणं बंद केलं मात्र ती विकली नाही. त्यांना चिंता होती, की उद्या मुलाचं नाटक चाललं नाही तर काय…’ भरतनं पुढं लिहीलं आहे, की मी पहिली लग्झरी कार (luxury car) ऑटोमॅटिक होंडा अकॉर्ड घेतली तेव्हा पहिल्यांदा त्यानं वडिलांना स्टिअरिंग व्हील हाती दिलं. भरतसह वडिलांचेही डोळे पाणावणारा तो क्षण होता. त्यानंतर भरतनं अनेक बीएमडब्ल्यूसारख्या (BMW) लग्झरी गाड्या घेतल्या. ‘मला आनंद या गोष्टीचा आहे, की त्यांच्या हयातीतच मी मला शक्य असलेलं सुख त्यांना देऊ शकलो. त्यांच्या आशिर्वादातूनच मी हा प्रवास केला आहे. आज माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही (Vanity van) त्याच टॅक्सीचा फोटो लावलेला आहे.’ असं भरत शेवट करण्याआधी लिहितो. ‘अण्णा… आज मी तुम्हाला खूप मिस करतो आहे. तुमच्यासारखा देवमाणूस मी आयुष्यात पाहिला नाही.’ असा शेवट करून भरतनं ही पोस्ट अजूनच उंचीवर नेली आहे. दोन तासांपूर्वी लिहलेल्या या पोस्टला तीन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी भरतचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या