JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / खेसारी लालच्या कोलगेट डान्सचा धुमाकूळ; काही तासांत मिळाले 4 कोटी व्ह्यूज

खेसारी लालच्या कोलगेट डान्सचा धुमाकूळ; काही तासांत मिळाले 4 कोटी व्ह्यूज

कनिष्काचा ग्लॅमरस अवतार अन् खेसारीचा कोलगेट डान्स; या नव्या गाण्याचा व्हिडीओ इंटरनेवर घालतोय अक्षरश: धुमाकूळ

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 एप्रिल**:** खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) हा भारताताली सध्याच्या सर्वोधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून चर्चेत असतो. खरं तर तो एक भोजपूरी अभिनेता आहे. त्यानं अद्याप इतर भाषांमध्ये काम केलेलं नाही. मात्र त्याची गाणी देशभरातील प्रेक्षकांना भुरळ घालतात. त्यामधील संगीत आणि त्याची नाचण्याची शैली प्रेक्षकांना विषेश आवडते. (Colgate song) सध्या त्याचं असंच एक गाणं रसिकांना नाचण्यासाठी प्रवृत्त करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याच्या या गाण्याला काही तासांत चार कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरुन खेसारी लालच्या जादूचा अंदाज आपल्याला येतो. खेसारी लाल म्हणजे म्युझिक इंडट्रीमधील सध्याची हीट मशीन असं म्हटलं जातं. अन् या हीट मशीनचं कोलगेट साँग सध्या चर्चेत आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री कनिष्का नेगी देखील थिरकताना दिसत आहे. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून प्रेक्षक अवाक् झाले आहेत. तिला देखील देशभरातील लाखो लोक सोशल मीडियावर फॉलो करतात. या गाण्यात दोन लोकप्रिय कलाकार एका धमाकेदार गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या गाण्याला गेल्या 48 तासांत 4 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अवश्य पाहा - सुशांतपूर्वी रिया या अभिनेत्याला करत होती डेट; अभिनेत्रीचा नवा खुलासा

खेसारी लाल लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. सध्या तो एका भोजपूरी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलिकडेच त्यांनी महेश भट्ट यांच्यासोबत एक मिटिंग केली होती. या मिटिंगचे फोटो देखील चर्चेत होते. त्यामुळं भोजपूरी सिनेसृष्टीतील हा सुपरस्टार आता बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका साकारणार की सहाय्यक भूमिका हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या