सुशांतपूर्वी रिया या अभिनेत्याला करत होती डेट; अभिनेत्रीचा नवा खुलासा

सुशांतपूर्वी रिया या अभिनेत्याला करत होती डेट; अभिनेत्रीचा नवा खुलासा

‘फायदा थांबताच तिनं अभिनेत्याला सोडलं’; सुशांतपूर्वी रिया या सेलिब्रिटीला करत होती डेट

  • Share this:

मुंबई 12 एप्रिल: अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळं (Sushant Singh Rajput death case) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. ती सुशांतची गर्लफ्रेंड होती. चित्रपटांमुळं तिला जितकी प्रसिद्धी मिळाली नाही त्यापेक्षा कैकपटीनं सुशांत प्रकरणामुळं ती चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यूसाठी चाहते तिला जबाबदार धरत आहेत. अर्थात हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. पण याच दरम्यान आता आणखी एक आरोप सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख (Smita Parikh) हिनं केला आहे. “सुशांतपूर्वी ती एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती. पण त्याच्याकडून मिळणारी मदत थांबताच तिनं सुशांतसोबत अफेअर केलं.” असा आरोप तिनं केला आहे.

स्मिता पारिख आणि सुशांतमध्ये खूप चांगली मैत्रीण होती. ती एक दिग्दर्शक आहे. तिनं आजवर काही प्रायोगिक नाटकांमध्येही काम केलं आहे. एका शॉर्ट फिल्मच्या निमित्तानं सुशांतसोबत तिची मैत्री झाली होती. तिनं सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच एक ट्विट केलं आहे. यामध्ये तिनं रिया चक्रवर्तीवर फसवणूकीचे आरोप केले आहेत. “सुशांतपूर्वी ती आदित्य रॉय कपूरला डेट करत होती. असं वाटतंय हा एक प्रकारचा सेटअप होता. आदित्यकडून मिळणारा फायदा थांबताच तिनं सुशांतला डेट करण्यास सुरुवात केली. यासाठी तिला एक अतृप्त आत्मा देखील मदत करतो.” अशा आशयाचं ट्विट स्मितानं केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा - 'The Family Man 2' ची वाट पाहाणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; रिलीजबाबत मोठी घोषणा

सुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एनसीबीनं न्यायालयासमोर 30 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबतच आणखी 30 जणांनी नावं आहेत. शिवाय या प्रकरणी काही ड्रग्ज पेडलर्सला देखील एनसीबीनं अटक केली आहे.

Published by: Mandar Gurav
First published: April 12, 2021, 8:56 AM IST

ताज्या बातम्या