JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कार्तिक आयर्न आणि करण जोहरचा 'दोस्ताना' तुटला; चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता

कार्तिक आयर्न आणि करण जोहरचा 'दोस्ताना' तुटला; चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता

या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या आगामी चित्रपटात आता दुसरा एखादा स्टार किड अभिनय करताना दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 एप्रिल**:** बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्यानं केलेल्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं त्याला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची अक्षरश: रांग लागली आहे. मात्र कार्तिकच्या याच लोकप्रियतेमुळं करण जोहरसोबतची त्याची मैत्री संपुष्टात आली. (Karan Johar) करणनं त्याला त्याच्या दोस्ताना 2 (Dostana 2) या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या आगामी चित्रपटात आता दुसरा एखादा स्टार किड अभिनय करताना दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्तिक गेली दोन वर्ष दोस्ताना या चित्रपटामुळं चर्चेत होता. या चित्रपटासाठी त्यानं 20 दिवसांचं शूटिंग देखील केलं होतं. परंतु मग इतर चित्रपटांसाठी त्यानं दोस्तानंचं चित्रीकरण थांबवलं. शिवाय त्यानं पटकथेत काही सुधारणा देखील सुचवल्या होत्या. या सुधारणा करण्यास करण तयार नव्हता. अखेर दोघांमध्ये मतभेद झाले. परिणामी धर्मा प्रोडक्शनमधून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अवश्य पाहा  - सलमान की अजय कोण मारणार बाजी? एकाच दिवशी होणार 3 चित्रपटांचा धमाका 2019 मध्ये नोव्हेंबर महिन्यात जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. अमृतसर येथे चित्रीकरण करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता ‘दोस्ताना २’ या चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘दोस्ता 2’ हा 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दोस्ताना’ या हिट चित्रपटाचा सीक्वल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या