JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / “कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का?”; पाकिस्तानची स्तुती केल्यामुळं भडकले भारतीय

“कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का?”; पाकिस्तानची स्तुती केल्यामुळं भडकले भारतीय

“आम्ही भारतीय पाकिस्तानच्या सहानुभूतीचा आदर करतो”; नेहमी आगपाखड करणाऱ्या कंगनानं यावेळी केली पाकिस्तानची स्तुती

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 एप्रिल**:** बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा तिच्या बाबतीत घडला आहे. नेहमी पाकिस्तानवर (Pakistan) आखपाखड करणाऱ्या कंगनानं यावेळी त्यांची स्तुती केली आहे. (Kangana praises Pakistan) मात्र या स्तुतीमुळं काही नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. तिला सध्या जोरदार ट्रोल केलं जात आहे.

 अवश्य पाहा - अरजित सिंहचं करिअर होणार होतं उध्वस्त; घेतला होता सलमानशी पंगा “पाकिस्तानात चाललेला टॉप ट्रेंड पाहून फार छान वाटलं. #PakistanStandsWithIndia… भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं पाकिस्तानचं कौतुक केलं होतं. मात्र तिचं हे कौतुक काही भारतीय नेटकऱ्यांना आवडलं नाही. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? चर्चेत राहण्यासाठी आता तू काहीही ट्विट करु लागली आहेस का? मोदींच्या नजरेत येण्यासाठी ही बाई आता काहीही ट्विट करतेय अशा अशयाच्या प्रतिक्रिया देऊन या ट्विटसाठी कंगनाला सध्या जोरजार ट्रोल केलं जात आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

पाकिस्तानच्या या मदतीवर भारताने अद्याप कोणताही निर्णय दिला नसला तरीही अनेकजन याच कौतुक करत आहेत. आणि कंगनाने देखिल हा ट्रेंड पाहून पाकिस्तानची स्तुती केली आहे. कंगना लवकरच ‘थलायवी’ (Thalaivi), ‘धाकड’, ‘तेजस’ या चित्रपटातं दिसणार आहे. थलायवी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाउनमुळे चित्रपटाचं प्रदर्शन रद्द झालं आहे. पण कंगना तिच्या ट्विटर सतत सक्रिय असते. रोजच निरनिराळ्या विषयांवर भाष्य करत ती ट्विट करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या