मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अरजित सिंहचं करिअर होणार होतं उध्वस्त; घेतला होता सलमानशी पंगा

अरजित सिंहचं करिअर होणार होतं उध्वस्त; घेतला होता सलमानशी पंगा

यशाच्या शिखरावर असलेल्या अरजीतचं करिअर अभिनेता सलमान खानमुळं (Salman Khan) संपलं असतं. इतकंच काय तर अरजितला सलमानची जाहीर माफी मागून “माझं करिअर संपवू नकोस” अशी विनंती करावी लागली होती.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 25 एप्रिल: अरजित सिंह (Arijit Singh) हा सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या सुरेल आवाजानं मंत्रमुग्ध करणाऱ्या अरजितनं आजवर ‘तुम ही हो’, ‘जनम जनम’, ‘अगर तुम साथ हो’, ‘हमारी अधुरी कहानी’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. देशभरातील अनेक नवे गायक आज त्याला आपला आदर्श मानतात. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज यशाच्या शिखरावर असलेल्या अरजीतचं करिअर अभिनेता सलमान खानमुळं (Salman Khan) संपलं असतं. इतकंच काय तर अरजितला सलमानची जाहीर माफी मागून “माझं करिअर संपवू नकोस” अशी विनंती करावी लागली होती.

नेमका वाद काय आहे?

2013 साली स्टार गिल्ड पुरस्कार सोहळ्यात अरजित आणि सलमानमध्ये शाब्दिक चकमक घडली होती. या सोहळ्यात सलमान आणि रितेश देशमुख होस्ट होते. दरम्यान अरजितला अशिकी 2 या चित्रपटातील तुम ही हो या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता. मात्र हा पुरस्कार देताना सलमाननं त्याची खिल्ली उडवली. जेव्हा तो स्टेजवर पुरस्कार घ्यायला आला तेव्हा सलमाननं “अरे झोपला होता का?” असा टोला त्याला लगावला. यावर अरजित म्हणला “तुम्ही आम्हाला झोपवलं.” यावर सलमान म्हणाला, “अशी गाणी वाजत राहिली तर झोप तर येणारंच.” अर्थात हा टोला अरजितच्या तुम ही हो या गाण्यावरुन लगावण्यात आला होता. यावेळी अरजित आणि गाण्याचे लेखक मिथून यांनी केलेला शाब्दिक प्रतिकार सलमानला आवडला नाही. “चला निघा इथून” असं म्हणत त्यानं त्या स्टेजवरुन जाण्यास सांगितलं.

अवश्य पाहा - OSCAR 2021 : प्रियांका चोप्राचा The White Tiger जिंकणार ऑस्कर? एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती

https://youtu.be/sjqzaos1QjM

मात्र या प्रकरणानंतर अरजितला काम मिळेनासं झालं. सलमानच्या दबंग या चित्रपटात अरजितचं एक गाणं होतं. ते गाणं देखील त्यानं काढून टाकलं. अरजित पूर्णपणे बेरोजगार झाला होता. एक वेळ अशीही आली होती जेव्हा अरजितनं जाहिररीत्या सलमानची माफी मागितली होती. “कृपया मला माफ कर. माझं करिअर असं उध्वस्त करु नकोस” अशी विनंती त्यानं केली. अन् त्यानंतर अरजितला पुन्हा एकदा काम मिळू लागलं.

First published:

Tags: Entertainment, Salman khan, Song