मुंबई, 10 फेब्रुवारी: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू, बॉलिवूड नेपोटिझम, ड्रग केस, महाराष्ट्र सरकार आणि आता शेतकरी आंदोलन याबाबत ट्विटरवरून (Twitter) विविध आणि रोखठोक मतं मांडणारी कंगना आता ट्विटरला रामराम करत आहे. याबाबतची माहिती तिने ट्विटरवरूनच दिली आहे. अभिनेत्री आता तिची मतं Koo App वर मांडणार असल्याची माहिती कंगनाने दिली आहे. ट्विटरवरून दिली माहिती कंगनाने असे ट्वीट केले आहे की, ‘ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकरच माझे अकाउंट डिटेल्स शेअर करेन. स्वदेशी #kooapp चा अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे.’
कंगना याआधी अनेक वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत आली होती. मंगळवारीच तिने स्वत:ची तुलना Meryl Streep आणि Gal Gadot शी करणारं एक ट्वीट केलं होतं. ज्याची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर तिला ट्रोल देखील व्हावं लागलं होतं.